पिंपरी-चिंचवड

मतदानाचे कर्तव्य बजावल्याचा आनंद कसा सांगू?

CD

पिंपरी, ता. २६ : तृतीयपंथियांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. आमच्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही योग्य उमेदवार निवडून देणार आहोत. रोजगार, स्वच्छतागृह, सन्मानाने वागणूक, इतर मिळणारा लाभ व सवलती...या सर्व समस्या सोडविणारा आमदार आम्हाला हवा आहे. केवळ मते मागून दुर्लक्ष करणारा नकोय. या निवडणुकीनंतर आम्हाला नक्कीच नवनियुक्त उमेदवार गांभीर्याने लक्ष देतील. यासाठी मतदानाचे कर्तव्य बजावल्याच्या भावना तृतीयपंथी (पारलिंगी) प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.
--
गुरुमैय्या प्राथमिक विद्यालय, चिंचवडेनगर येथे मतदान केले. जागरूक मतदार असल्याची जाणीव असल्याने मतदानाचा हक्क बजावला. लोकप्रतिनिधींनाही याची जाणीव हवी. आम्ही देखील मतदानाचा एक मोठा भाग आहोत. हे नवउमेदवाराला देखील समजणे गरजेचे आहे. त्यांनी आमच्या समस्यांची दखल गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करते.
- निकीता नारायण मुख्यदल, वाल्हेकरवाडी
--
चिंचवडमध्ये पहिल्यांदा मतदान केले आहे. मला मतदानाचा अधिकार मिळाला. मनापासून खूप आनंद वाटला. आम्ही हक्काने विविध मागण्या मांडू शकतो. आम्हाला समाजाने पुरुष व स्त्रीप्रमाणे दर्जा दिला आहे. याचा नक्कीच आनंद वेगळा आहे.
- झोया अक्षय शिरोळे, आळंदी
--
मी मतदान कामकाजाचे पोलिंग एजंट म्हणून घटक होतो. ज्या दिवशी फळ्यावर पारलिंगी या तिसऱ्या घटकाचा उल्लेख झाला. तो आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. मतदानाच्या फॉर्मवरही तिसरा पर्याय यावर्षी ठेवला होता. आमच्या वाकड सेंटरवर कुणीही पारलिंगी व्यक्ती मतदानासाठी नव्हती. पारलिंगी समुदायातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. राजकीय दृष्ट्या आपला लढा बळकट करण्यासाठी मुख्य धोरणे गरजेची आहेत. आम्ही देखील समाजाचे मतदार आहोत. राजकीय पक्षांनी यापुढे निवडणुकांमध्ये पोलिंग एजंट म्हणून व निवडणूक ॲम्बेसिडर म्हणून पारलिंगीची निवड करावी.
- अनिल शत्रुघ्न उकरंडे, पोलिंग एजंट, वाकड
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT