पिंपरी-चिंचवड

कर संकलन विभागातून वसुलीसाठी तगादा

CD

करसंकलन विभाग ः मार्चअखेरमुळे महापालिकेचा वसुलीसाठी तगादा

थकबाकीदारांच्या नावांची यादी ‘व्हायरल’

पिंपरी, ता. १८ ः मार्चअखेर असल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागाने मिळकतकर व थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. एक लाखापुढे थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांची यादी वृत्तपत्रात व महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, थकबाकी भरण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत.
राज्य सरकारने एक हजार एक चौरस फूट आकाराच्या निवासी व बिगरनिवासी अनधिकृत बांधकामधारकांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याची घोषणा तीन मार्च २०२३ ला केली आहे. त्यामुळे नागरिक मूळ मिळकतकर भरत आहेत. नागरिकांच्या सोईसाठी सर्व १५ विभागीय कर संकलन कार्यालयात कॅश काउंटर सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहेत. मात्र, मिळकतकर भरण्याचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नाही. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेले निवासी व बिगरनिवासी मिळकतधारक अद्यापही बिले भरत नसल्याचे चित्र आहे. वसुलीचे एक हजार कोटींचे टार्गेट पूर्ण होत नसल्याने करसंकलन विभागाने थकबाकीदारांच्या नावाची यादी वृत्तपत्रात आणि पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. वाकड, भोसरी व मोशी विभागीय कार्यालयातील मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

शैक्षणिक संस्था, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, कारखानदार, शॉपिंग मॉल, मोबाईल टॉवर, कंपनी, वर्कशॉप, व्यापारी, उद्योजक, मोकळी जागा, गाळा, घर, सदनिका, बंगला असलेल्या मिळकतधारकांची नावे आहेत. तसेच, काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एक लाखापासून कोटींपर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची नावांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत त्या भागात जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर नावांची यादी व्हायरल होत आहे. त्यामुळे थेट नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचत आहे. बदनामी नको म्हणून थकबाकीदार पैशांची जुळवाजुळव करून थकीत बिल भरण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे करवसुली वाढत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उरले अवघे तेरा दिवस
सन २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १३ दिवस शिल्लक आहेत. कर संकलन विभागास यंदा एक हजार कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. आतापर्यंत ६५० कोटींची वसुली झाली आहे. अद्याप ३५० कोटींची वसुली करणे शिल्लक आहे. त्यासाठी कर संकलन विभागाने वसुली मोहीम तीव्र केली आहे. नळजोड खंडित करणे, मिळकत जप्त करणे, हाउसिंग सोसायटीच्या नोटीस बोर्डवर थकबाकीदार सदस्यांची यादी लावणे, स्पीकरवर थकबाकीदारांची नावे घोषित करणे आदी प्रकारे कारवाई केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT