पिंपरी-चिंचवड

छपाईविना २० हजारावर वाहन परवाने प्रलंबित

CD

पिंपरी, ता. २४ : केवळ छपाई कागद नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जानेवारीपासून २० हजार ३९५ पक्के परवाने प्रलंबित राहिले आहेत. छपाईचे काम शासनमान्य एजन्सीकडे आहे.
मात्र, याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. कारण पक्का परवाना सोबत नसल्याने वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करत आहेत.

परवाना छपाईचे काम शासनमान्य एजन्सी युटीएलकडे आहे. आरटीओमध्ये नियमानुसार चाचणी व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वाहन परवाना मान्य केला जातो. यानंतर तो लगेच छपाईला पाठवला जातो. तो किमान दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे. इथूनपुढे सात ते दहा दिवसांत वाहनधारकांच्या हातात तो मिळणे आवश्यक असते. परंतु, अडीच-तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही परवाने मिळत नसल्याचे समोर आले आहे. १८ जानेवारी २०२३ नंतर म्हणजेच, किमान दोन महिन्यांपासून परवाने प्रलंबित राहिलेले आहेत. छपाईसाठी संबंधित एजन्सी आणि परवाने घरपोच देण्यासाठी टपाल खाते जबाबदार आहे. तसेच, यावर नियंत्रण आरटीओ प्रशासनाचे असणे आवश्यक आहे. वेळेत पुरवठा न केल्यास संबंधित एजन्सीला दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, अद्यापपर्यंत तशी कारवाई झाली नसल्याची ठोस माहिती आहे.
--
खासगी एजन्सीने वेळोवेळी प्रिंटचा पुरवठा करणे गरजेचे आहे. नागरिक डीजी लॉकरचा वापर करून परवान्याचा वापर करू शकतात. सध्या थोडेच परवाने प्रलंबित आहेत. उर्वरित प्रिटींग लवकरच होईल.
- सुरेश आव्हाड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT