पिंपरी-चिंचवड

‘ॲक्टिव्ह’ कोयता गॅंगवर कारवाई कधी?

CD

कोयता गॅंग ‘ॲक्टिव्ह’

वेळोवेळी घटना घडूनही पोलिसांकडून ठोस कारवाई नाही

पिंपरी, ता. १७ : पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही कोयता गॅंग ‘ॲक्टिव्ह’ आहेत. खून, प्राणघातक हल्ला, वाहनांची तोडफोड यासह दहशत माजवण्याचा प्रकार दिवसाढवळ्या पाठोपाठ घडत आहेत. पुण्यात अशा प्रकारच्या वाढत्या घटना समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हेगाराची झाडाझडती सुरू केली. कोयत्याचा मोठा साठाही जप्त केला. पिंपरी-चिंचवड शहरातही वेळोवेळी कोयत्याने दहशत माजवली जात आहे. अशाप्रकारे कोयता मिरवून दहशत माजवणाऱ्यांना पोलिस आवर कधी घालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोयत्याने वार, प्राणघातक हल्ला, कोयते नाचवून दहशत माजवली. कोयत्याने तोडफोड केली, अशा घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर वाढत असून, राजरोसपणे हल्ले होत आहेत. एखादी मोठी घटना घडल्यानंतर जागे होऊन कारवाईचा दिखावा करण्यापेक्षा पोलिसांनी वेळीच पावले उचलावीत. दहशत माजवून सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शस्त्रविरोधी पथक आठ महिन्यांपुरतेच
गुन्हेगारी रोखण्यासह बेकायदा शास्त्र बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शस्त्र विरोधी पथक स्थापन केले. या पथकाने सोळा पिस्तूल २७ कोयते जप्त केले. रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाईही केली. मात्र, वरिष्ठ अधिकारी बदलल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांतच हे पथक बंद करण्यात आले.


डिसेंबरमधील घटना
- चिंचवडमधील परशुराम चौकात तरुणाचा कोयत्याने वार करून खून
- पिंपरीत टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार
- शेलगाव येथे ट्रकचालकाला अडवून तलवारीचा धाक दाखवत ऐवज लुटला
- पिंपरीतील मोरवाडीत तरुणाला कोयत्याने मारहाण करून ऐवज लुटला.
- वाकडमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर चाकूने वार
- पिंपरीतील संत तुकारामनगर येथे चाकूचा धाक दाखवून ऐवज लुटला
- चिखलीतील जाधववाडीत तलवार, पालघनने वार करून तरुणाचा खून
- भोसरीतील दिघीरोड येथे महिलेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- चऱ्होलीत तरुणाचा कोयत्याने गळा कापून खून केला.
- पिंपळे गुरव येथे गुटख्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरीचालकावर कोयत्याने सपासप वार .
- निगडी, पिंपळे गुरव, केळगाव येथे कोयता, तलवार बाळगणारे तिघे अटकेत. दोन कोयते, एक तलवार जप्त,

जानेवारीतील घटना
- केळगाव रोडवर एकाला बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी अटक
- निगडी, यमुनानगर येथे एकावर कोयत्याने वार
- चाकणजवळील वाटेकरवाडी येथे कोयत्याचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज लुटला
- शेलपिंपळगाव येथे एकाच्या गळ्याला चाकू लावून ऐवज लुटला
- तळेगाव दाभाडे येथे घरात शिरून पिस्तूल व चाकूच्या धाकाने अकरा लाखांचा ऐवज लुटला
- चांदखेड येथील यात्रेत टोळक्याने कोयते, पिस्तूल घेऊन घातला राडा
- थेरगाव येथे कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

कोयता, दहशत अन् वार
- दिघीतील सावंतनगर येथे २२ डिसेंबरला चार जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता व सत्तुरने वार केले. मदतीसाठी आलेल्या लोकांना हत्यार उगारून जिवे मारण्याची धमकी
- कासारवाडी येथे २५ डिसेंबरला एका गुंडाने कोयत्याचा धाक दाखवत हप्ता मागितला. पैसे न दिल्यास मारण्याची धमकी देत
दहशत माजवली
- १० जानेवारीला चांदखेड येथील यात्रेत टोळक्याने अक्षरशः राडा घातला. कोयते मिरवीत पिस्तुलातून गोळीबार करून भरयात्रेत दहशत माजवली.

‘‘गुन्हेगारावर बारीक नजर आहे. वेळोवेळी कोम्बिग ऑपरेशन राबवले जात आहे. गुन्ह्यांनुसार मोकाचीही कारवाई केली जात आहे. शस्त्र विरोधी पथक दरोडा विरोधी पथकात विलीन केले असून, या पथकाकडून कारवाई सुरू आहे. मागील काही दिवसात पिस्तूल, कोयते जप्तीच्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या आहेत.’’
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT