पिंपरी-चिंचवड

मोटार उलटल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

CD

पिंपरी, ता. २९ : रस्ता दुभाजकाला मोटार धडकून उलटल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर पाच जणी जखमी झाल्या. ही घटना शनिवारी (ता. २९) सकाळी साडे सातच्या सुमारास चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाणपुलावर घडली.
कृतिका कौर सोधी (वय २३, रा. महेंद्र एमकेआर सोसायटी, मूळ - दिल्ली) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर दिगज्योत धिमन (वय २४, महेंद्र इंफिलिया सोसायटी, पिंपरी), मनी तोमर (वय २३), लुईस बारीतो बेनेझोला (वय २४), दृष्टी ठक्कर (वय २४), अनुष्का यादव ( सर्व रा. डी. वाय. पाटील कॉलेज गर्ल्स हॉस्टेल, पिंपरी) अशी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. या सर्व विद्यार्थिनी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास सर्व मैत्रिणी मोटारीतून थेरगाव येथे निघाल्या होत्या. दरम्यान, चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपुलावरून जात असताना मोटार रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. या भीषण अपघातात मोटारीतील सर्व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कृतिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चार विद्यार्थिनींना पिंपरीतील रुग्णालयात तर एकीला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT