पिंपरी-चिंचवड

नववीचा वर्ग सुरू होण्यास मोशीत अडचण महापालिका शाळा ः शंभर मुलींचे भविष्य टांगणीला

CD

पिंपरी, ता. ४ : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले मोशी प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग भरविण्यात येतात. शेजारीच आकांक्षा फाउंडेशनचे प्राथमिकचे चार वर्गदेखील भरतात. मात्र; वेळेचे गणित चुकत असल्‍यामुळे माध्यमिकच्या मुलींचा नववीचा वर्ग सुरू होण्याची प्रक्रिया लांबली आहे. परिणामी, महापालिकेच्या शाळेतील सुमारे शंभर मुलींचे भविष्य टांगणीला लागले आहे.
सावित्रीबाई फुले, मोशी या शाळेत तीन शाळा भरतात. सकाळी सव्वा सात ते दुपारी सव्वा १२ या वेळेत प्राथमिकचे पहिली ते आठवीचे वर्ग भरतात. या वर्गात एक हजार ७६ विद्यार्थी शिकतात. तर; दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मुलांची शाळा भरते. तिथे ९०० पटसंख्या आहे. तर; आकांक्षा फाउंडेशनचे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पहिली ते चौथीच्या वर्गात २०० मुले शिकतात. तथापि, गेल्या सहा महिन्यांपासून याठिकाणी मुलांसाठी आठवीचे वर्ग आणि मुलींसाठी माध्यमिकचे नववीचे वर्ग सुरू करण्याची मागणी पालक करत आहेत. शंभर विद्यार्थिनी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. पण; यासाठी वेळेत बदल करण्यास ‘आकांक्षा फाउंडेशन’चे व्यवस्थापन तयार नसल्याचे पालकांनी सांगितले आहे.
महापालिकेची जागा असतानाही आकांक्षा फाउंडेशनने सामंजस्याने घ्यावे. मोशीतील शिवाजीवाडी या मोकळ्या जागेत महापालिकेने ६ कंटेनर शेड तयार केली आहे. पण; याठिकाणी वर्ग भरत नाही. याउलट शाळेतील ९ वर्ग ताब्यात घेतले आहेत. चार वर्ग सोडून इतर वर्गात स्टोअर रूम, संगणक खोली केली आहे. तत्पूर्वी आकांक्षा फाउंडेशनच्या शिक्षकांनी सकाळी किंवा दुपारच्या टप्प्यात शाळा भरावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. नववीचा वर्ग सुरू होऊ शकत नसल्याचे उपायुक्त विजय थोरात यांनी सांगितल्याचे पालकांनी सांगितले.

दरम्यान, या परिसरातील नागेश्‍वर माध्यमिक शाळा रस्ता रुंदीकरणात येत आहे. त्यामुळे शाळेची इमारत पाडण्यात येत असल्याने आठवीनंतर मुलींनी शिकायला जायच कुठे ? असा प्रश्‍न पालकांना सतावत आहे. पालकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त विजय थोरात यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. यासंदर्भांत नुकतीच बैठकदेखील झाली आहे. याबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त विजय थोरात म्हणाले की, याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल.

‘‘करारानुसार महापालिकेने वर्ग बांधून देणे बंधनकारक आहे. आमच्याकडेच वर्गखोल्या कमी आहेत. आम्ही माध्यमिक विभागाकडे कसे देणार? हा पेच आमच्यापुढे निर्माण झाला आहे.’’
- निखिल एकबोटे, समन्‍वयक, आकांक्षा फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT