पिंपरी-चिंचवड

‘छावा’च्या पदाधिकाऱ्यांना अटक

CD

पिंपरी, ता. १६ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. १५) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. आकुर्डी येथे छावा मराठा युवा महासंघाच्या उपाध्यक्षांनी काळे टी-शर्ट हवेत फिरवून फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी लगेचच संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
गणेश नवनाथ भांडवलकर (वय २८, रा. जय मल्हार सोसायटी, अजंठानगर, चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या उपाध्यक्षांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रशांत प्रताप वायाळ (एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहाचे लोकार्पण सोमवारी (ता. १५) झाले. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास फडणवीस यांचा ताफा कार्यक्रमस्थळी येत असताना गणेश भांडवलकर यांनी आकुर्डी येथील डॉल्फिन प्लाझा इमारतीसमोर त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. काळ्या रंगाचा टी-शर्ट हवेत फिरवून घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिस भांडवलकर यांना अटकाव करीत असताना त्याने एका पोलिसाला धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या बाबत छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर म्हणाले, ‘‘ सनदशीर मार्गाने निषेध नोंदवणे, हा सरकारी कामात अडथळा ठरू शकत नाही. गृहविभाग दडपशाही मार्गाने आंदोलकांचा आवाज दाबू पाहत आहे. मात्र, जोपर्यंत आमच्या मागण्या विचारात घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाही.’’

छावा मराठा युवा महासंघाच्या मागण्या
- मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडवून कायद्याच्या चौकटीत टिकणारेच आरक्षण मिळावे
- अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये
- पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वस्तीग्रहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द करा
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तत्काळ करावी
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलनाकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावीत
- भक्ती शक्ती उद्यानाच्या बाजूचा भूखंड महापुरुषांच्या जयंतीसाठी पीएमआरडीएने खुला करावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT