पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

विश्वासाने नेलेली थार गाडी
परत न करता फसवणूक

पिंपरी : विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता व्यक्तीची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून थेरगाव येथे घडली. विजय महादू केदारी (वय ४७, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष गायकवाड (रा. चऱ्होली, पुणे) आणि एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी केदारी यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांची आरोपी आशिष याच्यासोबत ओळख झाली. आशिष याने केदारी यांचा विश्वास संपादन करून त्यांना ताम्हिणी घाटात १० एकर जमीन आली आहे. ती फार स्वस्तात मिळणार आहे, असे सांगून शेतकऱ्यांशी बोलायला जावे लागत असल्याचे कारण सांगून केदारी यांची १५ लाख रुपये किमतीची थार गाडी (एमएच १४/जेएक्स ९०८६) नेली. ती गाडी केदारी यांना परत न देता तिचा अपघात झाला असल्याचे केदारी यांना खोटे सांगितले.

कंटेनर मागे आल्याने चिरडून तरुणाचा मृत्यू
निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर रस्त्याच्या कडेला पारेक केले होते. मात्र; हे कंटेनर मागे येऊन त्याखाली चिरडून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार मोशीतील क्रांती चौक येथे गुरुवारी (ता. १८) घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनर चालक सुबोध नारायण शिरोळे (वय ५३, रा. मोशी) याला अटक केली आहे.

गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १७) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास रहाटणी येथे घडली. पती श्रीकांत सावता ढोक (वय ३२, रा. रहाटणी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रीसाठी आणलेला चार किलो गांजा जप्त
विक्रीसाठी आणलेला चार किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (ता. १८) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास सदगुरूनगर, म्हाळुंगे इंगळे येथे करण्यात आली. शंतुनुकुमार निराकर बेहेरा (वय २४, रा. म्हाळुंगे इंगळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह लखन हाडीया राऊत (रा. पानागिडी, जि. गंजम, ओडीसा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
वेगवेगळ्या लिंक त्यावर दाखवली जाणारी आमिषे , त्यावरून रिकामे होणारे बँक अकाऊंट अशी एक तरी तक्रार दिवसाला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल होता आहे. यात नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्यात येत आहे.चिखलीतील एका महिलेलाही नोकरीचे आमिष दाखवत लिंक पाठवली त्यात वेगवेगळे टास्क सांगत महिलेच्या खात्यावरून नऊ लाख व टास्कची रक्कम असा एकूण तेरा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

पत्रा उचकटून तीन लाखांचे केबल चोरले
निघोजे येथील एच.पी.ट्रॉनीक या कंपनीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ३ लाख रुपयांचे केबल चोरून नेले आहे. हा सारा प्रकार १६ ते १७ मे या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गणेश बबन कुलवडे (वय ३८, रा. चाकण) यांनी तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून महिलेचा विनयभंग
महिलेचा पाठलाग केला पुढे ‘मला उत्तर का देत नाही म्हणत थेट महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी एकावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १७) चऱ्होली येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून गोरख खंडू पठारे (रा. चऱ्होली) याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT