bhosari traffic
bhosari traffic sakal
पिंपरी-चिंचवड

Bhosari News : बेशिस्त वाहनचालक; पोलिसही ‘गायब’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या चौकात (भोसरी पीएमपीएल आगाराकडे जाणारा रस्ता) सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, भोसरी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष व नियोजनशून्य कारभारामुळे दररोज वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी, अपघात घडत आहेत. त्यामुळे बेशिस्त चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भोसरीतील इंद्रायणीनगर येथील इंद्रायणी चौक हा वर्दळीचा परिसर आहे. या चौकातून भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, स्पाइन रस्ता आदी भागांकडे वाहनांची ये-जा असते. परंतु, या ठिकाणी वाहन चालकांकडून सिग्नलचे नियम पाळले जात नाही. चौकातून चालक वाहने बेशिस्तपणे चालवत आहेत. या रस्त्यावर सकाळी कामगारांच्या कामावर जाण्याच्या व सायंकाळी सुटण्याच्या वेळेत वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे.

तरी येथे एकही वाहतूक पोलिस किंवा वॉर्डन उपस्थित नसतात. तसेच कधी वाहतूक पोलिस उपस्थित असले तरी ते केवळ बघ्याच्या भूमिकेत चौकात उभे असतात. पीएमपीएल प्रशासन व भोसरी वाहतूक पोलिस विभाग यांच्या दुर्लक्षामुळे व नियोजनशून्य कारभारामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या चौकात वाहनांच्या रांगा लागतात. छोटे-मोठे अपघात तर नित्याचे झाले आहेत.

वाहतुकीचे नियोजन महत्त्वाचे -
भोसरी वाहतूक पोलिस बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या मुद्यावर केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसतात. याठिकाणी पीएमपीएल डेपो हाकेच्या अंतरावर आहे. परंतु, पीएमपीएल विभागाला देखील येथील कोंडीच्या समस्येचे घेणे-देणे नसते. या चौकात ‘पीएमपीएल’ बसचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवतात.

भोसरी पोलिस वाहतूक विभागातर्फे येथे नियमितपणे वाहतूक पोलिस व वॉर्डन यांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त केलेल्या वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतुकीचे संचलन व नियोजन करण्यात यावे. याठिकाणी भोसरी वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा, जेणेकरून वाहतूक नियंत्रण करता येईल.

‘‘हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. पण याठिकाणी भोसरी वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. परिणामी किरकोळ अपघात कमी होतील.’’
- जयेश शिंदे, स्थानिक नागरिक

‘‘गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक संचलन करण्यासाठी एका पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दररोज पन्नास जणांवर कारवाई करण्यात येत आहे.’’
- दीपक सांळुखे, पोलिस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT