पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

गुन्हे वृत्त

दुचाकी कोलमडल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी, ता. २२ : रस्त्याने जाताना तरुणाची दुचाकी कोलमडली. त्यावरून दोघांनी दुचाकीचालक तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीचे नुकसान केले. ही घटना डांगे चौक येथे घडली.
रोहन बाळासाहेब वाळुंज (वय २२, रा. चापेकर चौक, चिंचवडगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून कामावरून घरी जात होते. डांगे चौकात त्यांच्या समांतर आरोपी दुचाकीवरून आले. आरोपींची दुचाकी कोलमडली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करीत दात पडला. फिर्यादी यांचे हेल्मेट घेऊन गाडीवर मारून गाडीचे नुकसान केले.
----------------------------

दुचाकी घसरून दुचाकीचालकाचा मृत्यू

पिंपरी, ता. २२ : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

अतुल शांतिलाल शहा (वय ५८, रा. रोझ आयकॉन, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शहा हे कुणाल आयकॉन रोडने दुचाकीवरून जात होते. अचानक दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या खांद्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

----------------------------

पाण्याच्या मोटारीच्या किमतीवरून दुकानदारासह कामगाराला बेदम मारहाण

पिंपरी, ता. २२ : पाण्याच्या मोटारीचा दर जास्त लावल्याच्या कारणावरून टोळक्याने दुकानमालक व त्यांच्या कामगाराला रॉडने बेदम मारहाण केली. हा प्रकार मुळशी तालुक्यातील नेरे येथील ढमालेवस्ती येथे घडला.
महेश अरुण जोगदंड (वय १९, रा. गणेश मंदिराजवळ, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे नेरे येथे दुकान आहे. तेथे एक जण मोटार खरेदीसाठी आला. त्याला मोटारीचे कोटेशन दिले असता एवढी महाग मोटार असते का असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून फिर्यादीचा कामगार यश हावळे यास तो मारहाण करू लागला. त्यानंतर त्याने त्याच्या इतर पाच ते सहा साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांचा कामगार यांना शिवीगाळ करीत रॉडने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गर्दी जमलेली पाहून आरोपी पसार झाले. यामध्ये दोघांना दुखापत झाली.

----------------------------

काळेवाडीत आठ किलो गांजा जप्त

पिंपरी, ता. २२ : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून आठ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई काळेवाडीतील विजयनगर येथे करण्यात आली.
जवाहर अर्जुनदास रामनानी (वय ६६, रा. साई एमरॉल्ड सोसायटी, विजयनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने भैरन बिनदाडी (रा. ओडिसा) याच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात समोर आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जवाहर याने विक्रीसाठी गांजा आणल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून जवाहर याला जेरबंद केले. त्याच्याकडून आठ किलो ७२८ ग्रॅम गांजा, मोबाईल व रोकड असा एकूण दोन लाख २० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
----------------------------


रिक्षाचालकाने चाकूच्या धाकाने तरुणाला लुटले

पिंपरी, ता. २२ : रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार निघोजे येथील महिंद्रा कंपनीसमोर घडला.
अमन माधव भिसे (वय २१, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे रिक्षातून घरी जात होते. दरम्यान, रिक्षाचालकासह रिक्षातील इतर तिघांनी महिंद्रा कंपनीसमोरील रस्त्यावर अमनला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २० हजार रुपयांचा लॅपटॉप, १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटला.
----------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT