पिंपरी, ता. २४ : मतदारसंघात सुसज्ज रस्त्यांची निर्मिती करणे, अत्याधुनिक रुग्णालय, उड्डाणपुलांची निर्मिती करून वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे, यासह शिक्षण, आरोग्य आदीसह विविध मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
आमदार बनसोडे म्हणाले की, मतदारसंघात विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. आगामी पाच वर्षाच्या काळात ती पूर्ण करायची आहेत. यामध्ये दापोडी ते निगडी अर्बन स्ट्रीट रस्ता मंजूर झाला आहे. ते काम पूर्ण करून घेणार आहे. प्राधिकरणमधील हरित सेतूची मंजूर कामांना प्रत्यक्षात उतरविणार आहे. निगडी ते दापोडी एक हजार मिलिमीटर व्यासाची नवीन पाइप लाईन टाकण्याचे काम पूर्ण करून घेणार आहे. दुर्गा देवी टेकडीवर निवासी योग व निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्वतः लक्ष देऊन घरातील प्रत्येक कुटूंबागणिक हक्काचे घर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
वल्लभनगर एसटी स्टॅंड व डेपोचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ‘हाफकीन’मधील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देणार आहे. पिंपरी डेअरी फार्म येथे होत असलेला पूल लवकर पूर्णत्वास होण्यासाठी पाठपुरावा करणार. कुटे हॉस्पिटल, जिजामाता हॉस्पिटल या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करणार व या ठिकाणी सर्व प्रकारची शस्त्रक्रिया सुरू करता येतील, यासाठी पाठपुरावा चालू आहे. प्राधिकरण व आकुर्डी भागातील वीज पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी नवीन उपकेंद्र उभारणार. शाहूनगर, संभाजी नगर येथे पर्यटन केंद्र उभारणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
‘‘गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे, नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद सोबतीला घेऊन मी या निवडणुकीला सामोरे गेलो होतो. पुढील पाच वर्षे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून सर्व समाजातील नागरिकांच्या सेवेस असणार आहे.
- अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी विधानसभा.
फोटोः 65507
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.