पुणे, ता. २४ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलने निर्विवाद एकतर्फी वर्चस्व राखत जेतेपद पटकाविले. कोंढव्याच्या मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चिंचवडचा एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
धनकवडी येथील भारती अभिमत विद्यापीठाच्या मैदानावर वरील सामने झाले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सीएम इंटरनॅशनल स्कूलने एकतर्फी वर्चस्व राखले. हिमानी रावत हिने अप्रतिम खेळ करत पाचवे मिनिट, नववे मिनिट आणि २८ वे मिनिट असे तीन गोल नोंदविले. शर्वरी माने हिने तिला चांगली साथ देत १९ व्या मिनिटाला गोल नोंदविला. पराभूत मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलला एकही गोल नोंदवता आला नाही. चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल आणि हिंजवडीच्या ब्ल्यू रीज पब्लिक स्कूलमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी सामना झाला. त्यात
लावण्या जोगदंड हिच्या एकमेव गोलाच्या बळावर एल्प्रो इंटरनॅशनलने विजय मिळविला.
उपांत्य फेरीचे निकाल
सीएम इंटरनॅशनल, बालेवाडी ः टायब्रेक, आरना सिंधव ३३ मिनिट (रिया जांगीड, आरना सिंधव, मृण्मयी सोनईकर, शर्वरी माने) ५ वि.वि. एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड नयना राज ३९ (अयोना पाटील, तीर्था सलियन) ३. मनसुखभाई कोठारी नॅशनल, कोंढवा ः (हाफ्सा बेग, अदिना पठाण, सूची झंवर) ३ वि.वि. ब्ल्यू रीज, हिंजवडी (अनन्या देवनहल्ली, मधुरा येवले) २.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.