पिंपरी-चिंचवड

आषाढी वारीच्या तोंडावरही इंद्रायणी प्रदूषितच

CD

देहू, ता. २ः आषाढी वारी तोंडावर आली असताना इंद्रायणी नदीचे प्रदूषण कायम असून देहूत नदीपात्रातील जलपर्णीची दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषित पाणी पवित्र तीर्थ म्हणून सेवन करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर, देऊळवाडा आणि वैकुंठस्थान जवळील इंद्रायणीचे पात्र स्वच्छ कधी होणार ? अशी विचारणा स्थानिक नागरिक आणि भाविक करत आहेत.
देहू ग्रामपंचायतीने योग्य असे नियोजन करून इंद्रायणीच्या पात्रात जलपर्णी वाढू दिली नव्हती. त्यावेळी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थानाजवळील इंद्रायणीचे पात्र स्वच्छ होते. तसेच या भागात नौकानयनही सुरु होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थानाजवळील नदीपात्रात जलपर्णी सतत वाढत आहे. त्यामुळे, भाविकांची गैरसोय होत आहे.
देवदर्शनासाठी इंद्रायणी नदीचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून सेवन करण्याची वारकऱ्यांमध्ये प्रथा आहे. मात्र, इंद्रायणीचे पाणी दूषित असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत देहू नगरपंचायतच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे म्हणाल्या,‘‘जलपर्णी काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होणार आहे.’’
PNE24U23535

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शिक्षक भरतीचे निकष बदलले; संस्थापकांच्या मनमानीला लगाम; आता मुलाखतीला १० तर शैक्षणिक पात्रतेला ९० गुण; ९००० शिक्षकांची भरती, वाचा...

Panchang 6 April 2026 : सोमवारचा दिवस शुभ की अशुभ? जाणून घ्या राहुकाल, शुभ मुहूर्त आणि तिथी!

आजचे राशिभविष्य - ६ एप्रिल २०२६

आजचे पंचांग आणि दिनविशेष : ६ एप्रिल २०२६

व्यक्तिनामा : अनुभवसंपन्न खांदे अन् कणखर नेतृत्व

SCROLL FOR NEXT