पिंपरी-चिंचवड

महायुतीच्या होर्डिंग्जमध्ये उमेदवार दाखवा फक्त पंतप्रधान मोदी व धनुष्यबाणावरच भर, महायुतीतील धुसफूस संपता संपेना

CD

पिंपरी, ता. २ : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील महायुतीमधील धुसफूस थांबता थांबत नाही. मतदारसंघात व विशेषकरुन वाकड परिसरात भाजपच्या प्रचाराच्या होर्डिंग्जमधून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचेच छायाचित्र गायब आहे. तर; होर्डिंग्जवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण यावरच भर दिला आहे.
मावळात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरवातीपासूनच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराने व भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, असे वाटत होते. मागील वेळी पार्थ पवार यांचा पराभव राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अद्याप विसरलेले नाहीत, तो त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे.
भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दाखविण्यापुरता प्रचार सुरु केला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांना अहवाल द्यायचा असतो, त्यासाठी दाखविण्यापुरता प्रचार केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व श्रीरंग बारणे यांच्यात टोकाचे राजकीय वैर होते. साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही ते झिरपले होते. त्याचाच प्रत्यय; वाकड परिसरात दिसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपच्या प्रचाराच्या होर्डिंग्जवरुन उमेदवार बारणे यांचेच छायाचित्र गायब आहेत. होर्डिंग्जवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व धनुष्यबाणाचाच फोटो आहे. भाजपच्या प्रचारात बारणे यांचे छायाचित्र फक्त होर्डिंग्जमध्येच नाही तर रिक्षाच्या पाठीमागचे बॅनर, प्रचाराची वाहने, फलक यांच्यातूनही गायब आहेत. त्यामुळे भाजपमधील जगताप यांचे कट्टर समर्थक बारणे यांचा प्रचार करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत शिवसेनेचे शहर प्रवक्ते प्रमोद कुटे म्हणाले, ‘‘राज्यात महायुतीच्या सर्व ठिकाणी असाच समान मायना होर्डिंग्जवर घेतला आहे. भाजपचा उमेदवार असेल तेथे कमळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार असेल तेथे घड्याळ व शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे धनुष्यबाण, असणार आहे. मतदार शेवटी चिन्हावरच मतदान करतात. त्यामुळे उमेदवारांचा फोटो घेतलेला नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT