पिंपरी-चिंचवड

गणेश मूर्ती विसर्जनाची तयारी महापालिकेकडून पूर्ण

CD

पिंपरी, ता. २८ : आगामी काळात होणाऱ्या तीन, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदी घाटांवर नियोजन केले आहे. यात नदीपात्रात मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम हौदांची निर्मिती केली आहे. हा सोहळा सुरक्षित, शांततेत व सुनियोजित होण्यासाठी शहरात १०१ ठिकाणी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, शहरात दीड दिवसांच्या गणरायांचे भाविकांनी गुरुवारी (ता. २८) विसर्जन केले.


क्षेत्रीय कार्यालयनिहाय विसर्जन घाट व हौद

- अ क्षेत्रीय कार्यालय : संभाजीनगर येथील साई उद्यान, शिवशाहू उद्यान, पिरॅमिड हॉल, नाना नानी उद्यान, आकुर्डीतील विठ्ठल मंदिर, सेन्ट उर्सुला स्लूक गेट, मोहननगर सांस्कृतिक भवन, काळभोरनगर येथील दुर्गे चौक, सेक्टर २६ गणेश तलाव, नियोजित महापौर निवास मैदान, काचघर चौक, आकुर्डीतील कै. पांडुरंग बुवा काळभोर सभागृह, पिंपरी भाजी मंडई वाहनतळ, चिंचवड एम्पायर इस्टेट पूल, सुदर्शननगर येथील पारिजात बन, लिंकरोड तेरेसा पुलाखाली विसर्जन हौद.

- ब क्षेत्रीय कार्यालय : रावेत येथील जाधवपाट, मळेकर वस्ती, के. टाऊनशेजारी, किवळे स्मशानभूमी घाट, महादेव मंदिर, मामुर्डी स्माशनभूमी घाट, रावेत येथील म्हग्ने वस्ती रस्ता येथे सागर केमिस्टजवळ, चिंतामणी गणेश मंदिरासमोर, चिंचवड येथील केळकर घाट, बिर्ला घाट, दशक्रिया मोरया घाट, जलतरण तलावासमोर, जिजाऊ पर्यटन केंद्र घाट, काळेवाडी स्मशानभूमी, जोतिबा उद्यान, अयप्पा स्वामी मंदिर.

- क क्षेत्रीय कार्यालय : मोशी घाट, चिखली घाट (संकलन केंद्र व विसर्जन हौद), भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारी गावजत्रा मैदान, भगत वस्ती येथील गणेश मंदिर, महादेव मंदिर सद्गुरूनगर येथील गृहलक्ष्मी सोसायटी, सेक्टर ६ प्राधिकरणातील जलवायू विहार, खराळवाडी येथील बालभवन उर्दूशाळा, नेहरूनगर येथील नेहरू पुतळा, मासुळकर कॉलनीतील स्केटिंग मैदान, एच. ए. मैदान.

- ड क्षेत्रीय कार्यालय : वाकड गावठाण घाट, ताथवडे गावठाण घाट, पुनावळे बंधारा घाट, राम मंदिर घाट, कस्पटे वस्ती स्मशानभूमी घाट, चोंधे लॉन्स घाट, पिंपळे निलख गावठाण घाट, पिंपळे सौदागर येथील दत्तमंदिर घाट, पिंपळे गुरव येथील श्रीकृष्ण मंदिर घाट, तुळजाभवानी मंदिर घाट, प्रभातनगर बुद्ध विहाराजवळील घाट

- इ क्षेत्रीय कार्यालय : डुडुळगाव घाट (इंद्रायणी नदी), दाभाडे वस्ती, वडमुखवाडीतील तापकीर चौक येथील अलंकापूरम सोसायटी, चऱ्होली घाट, भोसरीतील देवकर वस्ती येथील हनुमान कॉलनी, मोशी खाण, दिघीतील परांडेनगर दिघी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर, कृष्णानगर, राघव मंगल कार्यालय, दिघी गावठाणातील डोळस मैदान, बोपखेल घाट, डॉ. बाबासाहेब उद्यानासमोरील मैदान, गंगोत्री पार्क, भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्र.

- फ क्षेत्रीय कार्यालय : चिखली येथील टाऊन हॉल, घरकूल टाऊन हॉल, पूर्णानगर येथील दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, गणेशनगर येथील पांडुरंग पार्क, तळवडे येथील कै. अमुजी किसनराव शाळा, नदीघाट निघोजे पूल, यमुनानगर येथील ठाकरे मैदान.

- ग क्षेत्रीय कार्यालय : पिंपरीतील सुभाषनगर, पवनेश्वर घाट, वैभवनगर येथील श्री आसवानी कृत्रिम हौद (खासगी), माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयजवळ, थेरगाव गावठाण घाट, थेरगाव रुग्णालये हौद, थेरगाव दत्तमंदिर रस्ता घाट, महादेव मंदिर घाट, रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती चौक.

- ह क्षेत्रीय कार्यालय : संत तुकारामनगर येथील एचए मैदान, कासारवाडी स्मशानभूमीलगत, फुगेवाडी स्मशानभूमीलगत, दापोडी हॅरिस पूल घाट, दापोडी बॉम्बे कॉलनी घाट, नवी सांगवी येथील फेमस चौक, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलशेजारचे मैदान, एम. के. हॉटेल चौक, वेताळ महाराज घाट, दत्त मंदिर घाट, पवनानगर घाट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, वल्लभनगर पाण्याच्या टाकीजवळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT