पिंपरी, ता. २६ ः शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागात बांधकाम क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. या भागातील डीपी रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्याचा बांधकाम क्षेत्राला नक्कीच फायदा होईल. ग्राहकांच्या सेवेसाठी ‘सकाळ’ने बांधकाम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना एका छताखाली आणले, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित सकाळ वास्तू एक्स्पो २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त शेखर सिंह बोलत होते. यावेळी सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, जाहिरात विभागाचे उप सर व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, सहयोगी संपादक जयंत जाधव आदी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘मुंबईसह इतर शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचे हवा प्रदूषण वाढत आहे. २०१९ च्या पोल्युशन सोर्स प्रोपोर्शनमेंट स्टडीनुसार बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. ३० ते ३५ टक्के हवा प्रदूषण हे बांधकाम क्षेत्रामुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील नियम २.५ एवढे प्रदूषण हे वाहनांमुळे होते. प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही. प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्हाला थोडे फार खर्चिक पाऊल उचलावे लागेल.’’
----------
पायाभूत सुविधांवर भर
वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत आणि चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या भागात बांधकाम क्षेत्राला संधी आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार करून, शहराचा नवीन विकास आराखडा तयार केला जात आहे. शहराचा डीपी तयार करताना कॉम्प्रेसिव्ह मोबिलिटी प्लॅननुसार २०६१ मध्ये शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक दर्शविली आहे. त्यानुसार या भागात डीपी रस्ते विकसित केले जाणार आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील वर्षापासून डीपी रस्ते तयार करण्यावर भर दिला आहे. त्याचा बांधकाम क्षेत्राला फायदा होणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
-------
आयुक्त म्हणाले...
- पाणी जपून वापरावे लागणार
- पाणी बचतीसाठी प्लंबिंगचे वेगळे नियोजन करावे
- प्रोजेक्ट प्लॅन तयार करताना प्लंबिंग प्लॅन आवश्यक
- बांधकामाला एसटीपीचे पाणी वापरावे लागणार
- बिल्डरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे
- ई-ऑफिसचा बिल्डरांना फायदा होणार
सर्वसमावेशक प्रदर्शन ः सचिन खेडेकर
‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’मध्ये २५ लाखांपासून ते दहा कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी ‘सकाळ’ने एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध करून दिल्याने हे प्रदर्शन सर्वसमावेशक ठरले आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले. सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सचिन खेडेकर यांनी एक्स्पोतील प्रत्येक स्टॉलवर जाऊन पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या बांधकाम व्यवसायिकांच्या गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पांची माहिती घेतली.
फोटोः 09628, 09629
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.