पिंपरी-चिंचवड

बसचालकांना ‘आयडीटीआर’मध्ये प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. ७ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) चालकांच्‍या दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण नाशिक फाटा, पिंपरी येथील ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयडीटीआर) देण्यास सुरुवात करण्यात आली. प्रशासनाने स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या चालकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या पन्नास चालकांच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. बसच्‍या वाढत्‍या अपघाताला रोखण्यासाठी या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच ग्रामीण भागात ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत देखील प्रवाशांना सेवा दिली जाते. यातून दररोज सरासरी दहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसचा समावेश आहे. अनेकदा या चालकांकडून सिग्नलच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणे, वेगाने बस चालवणे, मोबाइल फोनचा वापर करणे आदीसह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहेत. परिणामी अपघाताला देखील सामोरे जावे लागत आहे. मुंबईमधील कुर्ला येथे बस अपघातानंतर पीएमपीएलने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नाशिक फाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) संलग्न आयडीटीआर संस्थेमार्फत दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

असे असणार प्रशिक्षण
- सहा जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान १५ तुकड्यांच्या ७५० चालकांना प्रशिक्षण दिले जाणार
- एका बॅचमध्ये ३० ठेकेदारांच्या आणि २० स्वमालकीच्या चालकांचा समावेश
- दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी साडे पाचपर्यंत आठ सत्रांत प्रशिक्षण दिले जाणार
- रस्‍ता सुरक्षा, मोटार वाहन काद्यातील तरतुदी, वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाईच्या तरतुदी, सीएनजी आणि इलेक्ट्रीक बसचे परिचलन, तणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन
- मनःशांती, योग आणि व्यायाम, अपघातानंतर प्रथमोपचार यांसह तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT