पिंपरी-चिंचवड

काळेवाडीच्या शर्विकाकडून राज्यातील १४० गडकिल्ले सर

CD

पिंपरी, ता. २५ : काळेवाडी येथील शर्विका म्हात्रे हिने कमी वयात अवघड लिंगाण्यासह १४० गडांवर भगवा फडकविला आहे. या गडांवरील पवित्र मातीचा संग्रह तिने आपल्या घरात केला आहे. गडकोटांवरची कन्या म्हणून शर्विका हिने ओळख मिळवली असून तिने आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
शर्विका ही मूळची अलिबागची. परंतु, सध्या ती काळेवाडीमध्ये राहते. राज्यातील सर्वात उंच शिखर तिने अवघ्या साडेतीन वर्षांत सर केले आहे. शर्विका सध्या सात वर्षांची आहे. तिने या गडकिल्ल्यांवरील मातीचा संग्रह केला आहे.
प्रत्येक गडावरून खाली आल्यावर त्या गडाचा इतिहास जेव्हा ही सांगते; तेव्हा शिवरायांचा पराक्रमाचे प्रसंग डोळ्यांसमोर उभे ठाकतात. या मातीत आपल्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे, असे ती नेहमी म्हणते. मला प्रत्येक गडांवर शिवराय दिसतात, असे ती सांगत असते. पुण्यात वॉल क्लाइंबिंगचे ती प्रशिक्षण घेत आहे. तिला रायगड भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तिच्या कर्तृत्वाने अखंड महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर तिचे ७४ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या नावावर तीन वेळा इंडिया बुक, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, दोन वेळा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन व ओएमजी व डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड पटकाविण्याचा मान आहे. राज्यातील सर्व दुर्ग सर करून इतिहासाच्यादृष्टीने गडकोटांचा अभ्यास आणि त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याचा तिचा मानस आहे.
ssociated Media Ids : PNE25V16462

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा निर्णय! शाळा ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत फाईलचा प्रवास आता ऑनलाइन; शाळा, तुकडी मान्यता, अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरीतील वशिलेबाजी, बनावटगिरी थांबणार

सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण! पोलिसांच्या मदतीसाठी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क, वाचा...

मोठी बातमी! शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने शिक्षकांची वाढली डोकेदुखी; १ मे रोजी निकालावेळी पालकांना दाखवाव्या लागणार त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका

आजचे राशिभविष्य - 29 एप्रिल 2026

Panchang 29 April 2026 : आजचे पंचांग! प्रदोष व्रत, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

SCROLL FOR NEXT