पिंपरी-चिंचवड

जमीन मोजणी, फेरफराच्या तक्रारींचे चटकन निरसन

CD

पिंपरी, ता. २५ : पिंपरी येथील नगर भूमापन कार्यालयाने नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांवर जलद कार्यवाही करण्याचे धोरण राबवले असून, येथील बहुतेक तक्रारींचे निरसन पंधरा दिवसांच्या आत करण्यात येत आहे. या कार्यालयात महिन्‍याकाठी सुमारे ४७५ हजार अर्ज दाखल होतात. तर दिवसाकाठी सरासरी २५ ते ३० नागरिक विविध कामांसाठी भेट देतात. यातील बहुतांश तक्रारी या मोजणी आणि फेरफार नोंदींसंदर्भात येत आहेत. त्‍या पैकी दोन टक्‍के अर्ज तक्रारींचे प्राप्‍त होत असल्‍याचे कार्यालयाचे म्‍हणणे आहे.

या कार्यालयांतर्गत मोजणीसाठी सुमारे ८० अर्ज, फेरफारचे १५० अर्ज आणि नकलेसाठी २०० अर्ज आणि इतर मिळून सुमारे ४७५ अर्ज प्राप्‍त होत आहेत. नागरिकांनी केलेल्या अर्जांची आहे. मोजणीच्या तक्रारींसाठी तक्रारदार व अर्जदार या दोघांना नोटीस बजावून सुनावणी घेतली जाते. त्यानंतर प्रकरणाच्या मेरिटवर निर्णय देण्यात येतो. तर फेरफारविषयक तक्रारींसाठी ‘ईपीआयसीएस’ (ईपीआयसीएस) या ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे नमुना-१२ ची नोटीस बजावली जाते. सुनावणी घेतली जाते आणि अंतिम निर्णय ऑनलाइन नोंदविला जातो. वर्षाकाठी या कार्यालयात सुमारे एक हजार ४४० अर्ज नकलेसाठी प्राप्त होत आहेत. त्यावरही ऑनलाइन कार्यवाही केली जाते. महिन्यात येणाऱ्या तक्रारी एकूण अर्जांच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी असतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. म्हणजेच महिन्‍याकाठी येणाऱ्या १२० अर्जांपैकी सुमारे २ ते ३ तक्रारीच येतात. या सर्व तक्रारींचे निरसन साधारणतः पंधरा दिवसांच्या आत करण्यात येते, असा दावा नगरभूमापन कार्यालयातून करण्यात आला आहे.

या सुविधांवर होतेय कार्यवाही
या कार्यालयांतर्गत संगणकीकृत मिळकत पत्रिका, सात-बारा उतारा, फेरफार नोंदणी उतारा, परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ प्रत, नमुना ९ व १२ नोटीसची प्रत, त्रुटी पत्र रिजेक्शन पत्र, विवादग्रस्त नोंदणी उतारा, अपिल निर्णयाच्या प्रती, नगर भूमापन आलेख, संगणकीकृत तयार होणारे अभिलेख (आकारबंद, आकारफोड, चौकशी नोंदवही उतार) आदी सुविधा दिल्या जात आहेत.

‘ईपीआयसीएस’ प्रणाली म्हणजे काय?
भूमिअभिलेख विभागाची ‘ईपीआयसीएस’ ही संगणकीय प्रणाली आहे, जी मिळकतपत्रिकेवरील खरेदी आणि वारसा नोंदींसारख्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करते. ही प्रणाली नागरिकांना घरबसल्या अर्ज करून मिळकतपत्रिकेवरील नोंदी (उदा. खरेदी नोंद, वारस नोंद) करण्याची सुविधा देते. ज्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची गरज कमी होते. या प्रणालीद्वारे मिळकतपत्रिकेवरील विविध नोंदींसाठी अर्ज करता येतो आणि त्याची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येते.

कार्यालयात तक्रारीसाठी येणाऱ्या अर्जाची संख्या कमी आहे. महिन्‍याकाठी दोन ते तीन टक्‍केच तक्रारी प्राप्‍त होत आहेत. या तक्रारींवर १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊन त्‍याचे निरसन करत आहे.
- अमित ननावरे, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard In Hotel : ब्रेकिंग! कोल्हापुरातील हॉटेलमध्ये घुसला बिबट्या ! दोघांवर केला जीवघेणा हल्ला, वनरक्षक जखमी

दिल्लीत स्फोटानंतर मी रात्रभर....; PM मोदींनी अतिरेक्यांना दिला कडक इशारा, भूतानला जाण्याबद्दल दिलं स्पष्टीकरण?

Rohit Sharma: 'मेरे यार की शादी...' रोहितनं स्वत:च गाणं वाजवत डान्स करून नवरा-नवरीला केलं शॉक; Video Viral

Latest Marathi Breaking News : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

MPSC: हजारो उमेदवारांचा तीन वर्षांचा संघर्ष वाया; लिपिक टंकलेखक भरतीची प्रतीक्षा यादी न लावल्याने उमेदवारांचा संताप

SCROLL FOR NEXT