पिंपरी-चिंचवड

संवाद माझा

CD

संवाद माझा

वाहतूक पोलिस नावापुरतेच
निगडी-भोसरी रस्त्यावरील गवळी माथा चौकातील सिग्नल व्यवस्था केवळ नावासाठी आहे असे वाटते. सिग्नल लाल असतांनाही खासगी बस, रिक्षा, कार, आणि दुचाकीस्वार सिग्नलकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. चौकाच्या एका कोपऱ्यात वाहतूक पोलिस असहाय्यपणे उभे असल्यासारखे दिसतात. कालच कोथरूड परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला रिक्षावाल्याने मारहाण केल्याची बातमी आली आहे. कारण त्यांनी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या एका रिक्षावाल्याला रिक्षा थोडी पुढे घ्यायला सांगितले. हे ज्येष्ठ नागरिक पुण्यातील अनेक भागांत जाऊन वाहतूक नियंत्रणाचे काम करून वाहतूक पोलिसांना मदत करत असतात.
-शिवराम वैद्य, निगडी
PNE25V38389

तळेगाव-चाकण रस्त्यावर बेशिस्त पार्किंग
तळेगाव-चाकण रस्त्याजवळ भंडारा डोंगरालगत शहरातील अनेक चालक बेशिस्तपणे वाहने उभी करतात. त्यामुळे कोंडी होते. तळेगाव दाभाडे शहरात वाहनतळ उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मात्र, या रस्त्यावर खूप गर्दी आहे. चालक मनमानी पद्धतीने वाहन पार्क करत असल्याने त्याचा अनेक वाहनांना अडथळा निर्माण होतो. यातून होणारे वाद आता नित्याचे झाले आहेत.
- सचिन वरघडे, तळेगाव दाभाडे
PNE25V38386

सिग्नल २५ दिवसांपासून बंद
नवीन ऑटो क्लस्टर चौकातील सिग्नल मागील सुमारे २५ दिवसांपासून बंद आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक पोलिसांवर ताण पडतो आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पोलिसांनी या समस्येची तातडीने सोडवणूक करावी.
- श्याम मेमाणे, शाहूनगर
PNE25V38385

बर्ड व्हॅली पदपथावर उंदरांचा वावर
संभाजीनगर येथील महानगर पालिकेचे बर्ड व्हॅलीमधील पदपथ गेली दोन महिन्यांपासून पडली आहे. त्यामुळे सकाळी नागरिकांना फिरता येत नाही. जागोजागी ब्लॉक निघाले असून त्यामधून सर्रास उंदरांचा वावर दिसत आहे. परंतु प्रशासनाचे पूर्ण दुर्लख आहे. ठेकेदाराचे निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
- ॲड. पी. एन. जाधव, संभाजीनगर
PNE25V38390

सार्वजनिक स्वच्छतागृहात गैरसोय
संत ज्ञानेश्वर महाराज गार्डन निगडी प्राधिकरण येथील पुरुषांच्या सार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. शौचालयातील नळ महिनाभरापासून बंद आहे. नळदेखील तुटलेले आहेत. बेसिनचा नळ गळत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
-आनंदा माने, बिजलीनगर, चिंचवड.

Id: PNE25V38388

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

Latest Marathi News Updates: देश-विदेशात आज दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT