पिंपरी-चिंचवड

रावेत, किवळे परिसरासाठी २२० केव्ही उपकेंद्र उभारावे

CD

पिंपरी, ता. २७ : ‘‘रावेत, किवळे परिसरात लोकवस्ती वाढत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. यामुळे यंत्रणेवर ताण येऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कमी दाब आणि अपुऱ्या क्षमतेबाबत तक्रारी आहे. त्यांवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून या भागासाठी स्वतंत्र २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारावे,’’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
‘‘विजेच्या तक्रारी सोडविण्यासाठी आणि भविष्यातील विकास आराखडा आखून वीज उपकेंद्र तातडीने उभारण्याची आवश्यकता आहे. महावितरणने २२० केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव तयार केला आहे. महापारेषणमार्फत ते उभारले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील वीजवाहिन्यांवरील ताण कमी होऊन अधिक स्थिर, सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे,’’ असे कातळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘‘रावेत, किवळे परिसरातील नागरिकांना स्थिर आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी २२० केव्ही उपकेंद्र अत्यावश्यक आहे. ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कातळे यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT