पिंपरी-चिंचवड

अस्वच्छता, दुर्गंधी अन् अंधार

CD

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी चिंचवड शहरातील महामार्ग व साठ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्ते ओलांडण्यासाठी महापालिकेने सहा ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग उभारले आहेत. आणखी काही भुयारी मार्गांची योजना आहे. मात्र, कार्यान्वित असलेल्या भुयारी मार्गांची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी दिवे चोरीला गेल्याने रात्री अंधार असतो. सुरक्षा नसणे, अस्वच्छता, दुर्गंधी, अंधार अशा समस्यांनी वेढलेल्या भुयारी मार्गांचा ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.
पिंपरी चिंचवड शहराच्या पूर्वेस आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी मार्ग आहे. पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग शहरातून गेले आहेत. औंध-रावेत-किवळे बीआरटी मार्गाचे रुंदीकरण महापालिकेने केले आहे. मुंबई-बंगळूर महामार्ग (सेंट्रल चौक देहूरोड ते कात्रज बाह्यवळण मार्ग) शहराच्या पश्चिमेकडून आहे. तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता चिखली बीआरटी मार्ग शहराच्या मध्यातून आहे. हे सर्व रस्ते ६० मीटरपेक्षा अधिक रुंद आहेत. आणखी काही ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग उभारणीचे नियोजन आहे. मात्र, अस्तित्वात असलेल्या भुयारी मार्गांची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था पाहणे महापालिकेची जबाबदारी आहे. तशी परिस्थिती ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळली नाही. त्यामुळे पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे.

भुयारी मार्ग कशासाठी
- साठ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्ते ओलांडण्यासाठी
- चालत रस्ता ओलांडल्यास अपघाताचा धोका अधिक
- पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी
- वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी

सध्याचे भुयारी मार्ग
- औंध-रावेत-किवळे बीआरटी मार्गावर रक्षक चौकात
- पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी, बिगबजार चिंचवड स्टेशन आणि निगडी
- आळंदी-पुणे पालखी मार्गावर वडमुखवाडी थोरल्या पादुका मंदिराजवळ
- काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता चिखली बीआरटी मार्गावर काळेवाडी
(वृत्तसंकलन ः पीतांबर लोहार, आशा साळवी, प्रदीप लोखंडे, सुबोध गलांडे, संजय बेंडे, रमेश मोरे, संदीप सोनार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT