पिंपरी, ता. २ : फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा १४२ व ट्रेक किल्ले वासोटा येथे आयोजित केला होता. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील क्लबचे ३२ सदस्य सहभागी झाले. ट्रेक निमित्त सदस्यांनी निसर्गभ्रमंतीचा व बोटीतून फिरण्याचा आनंद घेतला.
फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष ७२ वर्षीय वसंत ठोंबरे यांनी वासोटा किल्ला सर केला. ट्रेक लीडर म्हणून मधुकर पगार, नीलेश रबडे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, दिलीप कुबडे, विजय मालुसरे, शिवाजी काळे सदस्यांनी मार्गदर्शन केले. बामनोली ते इंदवली बोटीने प्रवास करून सकाळी ११ वाजता ट्रेकला सुरुवात झाली.
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यात व जंगलात वसलेला वनदुर्ग म्हणजे वासोटा किल्ला होय. हा किल्ला अतिशय प्राचीन असून याची उंची ४३६७ फुट आहे. बामनोली येथून लॉन्चने वनखात्याच्या परवानगीने किल्ल्यावर जाता येते. हा परिसर प्लॅस्टिक आणि कचरामुक्त आहे. या किल्ल्यावरून चकदेव, रसाळगड, सुमाळगड व महिपत गड व नागेश्वरची गुहा व कोकण परिसर असा विलोभनीय परिसर दिसतो. विना छताचे मारुतीचे मंदिर, राजवाड्याचे अवशेष, जुना वासोटा, बाबू कड्याचा कडेलोट पॉइंट, प्रतिध्वनी पॉइंट, काळकाईचे ठाणे व महादेवाच्या मंदिराची पाहणी केली.
या ट्रेकमध्ये ज्येष्ठ नागरिक शिवाजी नाईकरे पाटील, कैलास झिरखंडे, एकनाथ देशमुख, महिलांमध्ये संगीता देशमुख, विद्या लांडगे, विद्या सावंत, प्रणाली नेवे, संगीता, अरगडे, साधना काळे, छाया पानसरे, सुनिता सुतार अपूर्वा गावडे, राधिका मडिकंट, मुलांमध्ये रिद्धेश नेवे, विवेक मालुसरे व ओंकार मालुसरे सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.