पिंपरी, ता. १२ : गोव्यातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि अग्निशमन विभाग सतर्क झाला आहे. पीएमआरडीए क्षेत्रातील सर्व स्टार हॉटेल, क्लब, पब, रेस्टॉरंट आणि कार्यक्रम स्थळांनी नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च असल्याने कोणत्याही प्रकारची ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.
अग्निशमन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैध ‘अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र’ अनिवार्य असून त्यातील सर्व अटी पूर्ण असणे बंधनकारक आहे. परवानगीपेक्षा जास्त गर्दी न करणे, सजावटीचे लाइट्स, साउंड आणि वायरिंगची अधिकृत विद्युत अभियंत्याकडून तपासणी करणे, ओव्हरलोड किंवा सैल वायरिंग तत्काळ काढणे या महत्त्वाच्या सूचनांचा यात समावेश आहे. किचन, बार आणि स्मोकिंग एरियातील गॅस लाईन, फ्रायर्स, सिलेंडर्सची सुरक्षा तपासणी करणे, स्मोकिंग एरिया स्पष्ट आणि सुरक्षित ठेवणे, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म व स्प्रिंकलर प्रणाली कार्यरत असणे आवश्यक असल्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन मार्ग, एक्झिट दरवाजे सतत मोकळे ठेवणे, तात्पुरत्या सजावटीसाठी अग्निरोधक साहित्याचा वापर करणे, बंद जागेत फटाके व पायरो तंत्राचा वापर न करणे, तसेच अग्निशमन वाहनांसाठी मार्ग कायम मोकळा ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. मोठ्या कार्यक्रमांचे लेआऊट व तपशील जवळच्या अग्निशमन केंद्राला देणेही आवश्यक आहे.
---
उत्सव आनंदात साजरे करा, पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. गोव्यातील दुर्घटना ही सर्वांसाठी धडा आहे. पुणे महानगर प्रदेशातील प्रत्येक कार्यक्रम सुरक्षित राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.