पिंपरी-चिंचवड

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या हालचाली

CD

पिंपरी,ता. ७ : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयटी कर्मचारी, रहिवासी आणि पीएमआरडीए, एमआयडीसी व वाहतूक विभाग यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता.७) पार पडली. यावेळी हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्यासोबतच अतिक्रमण हटविणे, राडारोडा काढणे , गतिरोधक लावणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

हिंजवडीतील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या आठवड्यात या परिसरात पाहणी दौरा केला होता. तेव्हा वाहतुकीच्या समस्यांबाबत सात जूनला बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. हिंजवडीसोबतच माण येथील पाठक रस्ता, भोईरवाडी या भागांतील नागरिक व आयटी कर्मचारी उपस्थित होते. माणमध्येही रस्ते, वाहतूक यांचा प्रश्‍न मोठा असून येथे ठिकाणी गतिरोधक व सीसीटीव्ही बसवावेत, हिंजवडी पोलिस ठाण्याचे काम लवकर सुरू करावे आणि वाहतूक पोलिसांची व वॉर्डनची संख्या वाढवावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. उपस्थितांनी मांडलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.

हिंजवडी व माण परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मोठा आहे. मात्र, त्या तुलनेने वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढवली जावी. तसेच फेज ३ मध्ये पोलिस स्टेशनसाठी एमआयडीसीने जागा दिली आहे. मात्र, अजून कामाला सुरूवात झालेली नाही. हे देखील काम मार्गी लावावे, अशी आमची मागणी आहे.
- गोकुळ ओझा, रहिवासी, हिंजवडी

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध मागण्या करत आहोत. मात्र, त्या ऐकण्यासाठी पहिल्यांदाच बैठका होत आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, हिंजवडी माणमध्ये विविध प्रशासकीय यंत्रणा असल्याने एखादे काम करण्यासाठी नागरिकांना सर्व यंत्रणांचे दरवाजे ठोठवावा लागत आहे. हे थांबले पाहिजे.
- पुष्पराज निंबाळकर, रहिवासी, माण

नागरिकांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन पुढील आठवड्यात संबंधित भागांची पाहणी करण्यात येणार आहे. नागरिक, प्रशासकीय अधिकारी, खासगी आस्थापना यांच्याशी चर्चा करून सर्वांना मान्य असेल असा निर्णय घेऊ.
- राहुल सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचा भावात चार दिवसांनंतर बदल, जाणून घ्या आज महाग झाले की स्वस्त?

Latest Maharashtra News Updates : : शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तीन कोटी

Guru Purnima 2025: गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? वाचा त्यामागील 'ही' पौराणिक कथा

Pune-Ahmednagar Railway : अहिल्यानगर महामार्गालगत नवा रेल्वे मार्ग; नव्या मार्गासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज

Kolhapur Crime News : मारहाणीचा बदला म्हणून केला खून, संशयित पळून जाण्याचा करत होते प्रयत्न; पण...

SCROLL FOR NEXT