Kolhapur Crime Newsesakal
कोल्हापूर
Kolhapur Crime News : मारहाणीचा बदला म्हणून केला खून, संशयित पळून जाण्याचा करत होते प्रयत्न; पण...
Shirol Kolhapur : तो राग मनात ठेवून यशने आपल्या दोन साथीदारांसह रविवारी रात्री उशिरा येथील मजरेवाडी मार्गावरील सिद्धार्थ चौकात अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला.
Kolhapur Shirol Crime : मारहाणीचा बदला घेण्यासाठी येथील अक्षय दीपक चव्हाण (वय २३) याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला. या प्रकाराने कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली आहे. कुरुंदवाड पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पोलिसांनी काही तासांच्या आतच खूनप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे. यश सुनील काळे (वय १९, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (२२, रा. इचलकरंजी) व श्रीजय बडसकर (२२, रा. औरवाड) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. खुनामागे अन्य कोणती कारणे आहेत, याचाही पोलिस तपास करीत आहेत.
पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, अप्पर अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी तपासाची यंत्रे गतिमान केली आहेत.