पिंपरी-चिंचवड

‘केटूएस’च्या नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

CD

पुणे, ता. १४ ः ‘केटूएस - कात्रज ते सिंहगड मॉन्सून अ‍ॅडव्हेंचर रेस २.०’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी मंगळवार (ता. १५) हा शेवटचा दिवस आहे.
लाइफफिट अरेना यांच्यातर्फे २६ जुलैला ही स्पर्धा होणार असून, यासाठी आतापर्यंत ३५० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. ही स्पर्धा कात्रज घाटापासून सुरू होऊन सिंहगड किल्ल्याच्या शिखरावर संपणार आहे. निसर्गरम्य पावसाळी वाटा, चढ-उतारांची चाचणी आणि आत्मबळाची परीक्षा असा सर्वांगिण अनुभव देणारी ही मोहीम पुण्याच्या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स क्षेत्रात एक महत्त्वाची स्पर्धा आहे.
स्पर्धेचे संचालक आणि लाइफफिट अरेनाचे संस्थापक महेंद्र लोकारे म्हणाले, ‘‘केटूएस ही फक्त स्पर्धा नाही तर स्वतःच्या मर्यादांना ओलांडण्याची आणि निसर्गाच्या कुशीत स्वतःला शोधण्याची संधी आहे. गेल्यावर्षीच्या यशानंतर यावर्षी देखील स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून, सहभागींसाठी हा अनुभव निश्चितच अविस्मरणीय ठरेल.’’
स्पर्धेत भाग घेण्यासाठी ‘टाऊनस्क्रिप्ट’ या प्लॅटफॉर्मचा वापर करा किंवा बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा. तसेच नोंदणी करताना ‘SAKAL20’ हा प्रोमो कोड वापरल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे.
------------------
फोटो ः 31388

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Traffic Police Video : ट्रॅफिक पोलिसांना भरचौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुंबईकरांचा संताप, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सदाशिव अमरापूरकरांना सिद्धार्थ जाधव मुळीच आवडत नव्हता... लोकप्रिय दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, 'ते हिंदीत काम करत होते म्हणून...'

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिका आता ‘इलेक्शन मोड’वर!; आयुक्तांकडून मतदान केंद्र व्यवस्थेचा आदेश

Viral: जिद्द जगण्याची! तरुण वादळात हरवला, ५ दिवस समुद्रात पोहत राहिला, पावसाचं पाणी प्यायला, नंतर 'असा' वाचला जीव

SCROLL FOR NEXT