पिंपरी-चिंचवड

नदी सुधार, पिंपरी डेअरी फार्म पुलाचे काम लवकर व्हावे

CD

पिंपरी, ता. १ : ‘पवना नदी सुधार प्रकल्पास गती देणे आणि पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश द्यावे,’ अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, ‘पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणची अधिकृत पर्यावरण मंजुरी व ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी अंदाजे १ हजार ४३४ कोटींचा निधी अपेक्षित आहे. चिपळूण व महाड शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरास आपत्कालीन निधीतून ५८० कोटी रुपये देण्याची विनंती महापालिका प्रशासनाने केली आहे. तसेच, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संरक्षण संचलनालय (एनआरसीडी) अथवा जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) यांच्यामार्फत निधी उपलब्ध झाल्यास या प्रकल्प मार्गी लागेल.
पिंपरी मिलट्री डेअरी फार्म उड्डाणपुलाचे रेल्वे मार्गावरील काम रेल्वे विभागाची परवानगी नसल्याने प्रलंबित आहेत. महापालिका स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाच्या कामास परवानगी मिळण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्य अभियंता, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याकडे पाठविलेला आहे. याबाबत पाठपुरावा झाल्यास पुलाचे काम मार्गी लागेल, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : तरुणाने गाठला निर्दयतेचा कळस ! जिवंत अजगर बाईकला बांधले, ५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अन्...व्हिडिओ व्हायरल

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताची वाढलीय डोकेदुखी!

Beed Case Updates: कसून चौकशी करण्याची मागणी; Dhananjay Deshmukh बघा काय काय म्हणाले? | Sakal News

Tejas Gadade : गोदावरीच्या लाटांवरून थेट जर्मनीपर्यंत! नाशिकचा तेजस गडदे भारतासाठी सज्ज

Latest Maharashtra News Updates Live: चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटले नाही जाणूनबुजून म्हंटले आहे : नरेश म्हस्के

SCROLL FOR NEXT