पिंपरी-चिंचवड

गणेशाच्या मूर्तींवर रंगकामाची लगबग

CD

सोमाटणे, ता. ३ : गहुंजेच्या मूर्तीकारांनी मातीशी असलेले नाते अजूनही जपले आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने गणरायाच्या मूर्तींवर रंगांचा अखेरचा हात फिरविण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी मूर्ती रंगवण्यासाठी काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे.

काळाच्या ओघात तरुण पिढीने शहरी भागात नोकरी-व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे गावोगाववी मातीकामाची कलाकुसर दुर्मीळ झाली आहे. सध्या पवनमावळ पूर्व भागातील गहुंजे येथील काही कलावंतांनी गणेशमूर्ती तयार करण्याच्या पूर्वपार चालत आलेल्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत हा व्यवसाय जपला आहे.
याबाबत मूर्तीकार हनुमंत कुंभार म्हणाले, ‘‘मातीपासून वस्तू, मूर्ती तयार करण्याच्या
व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्यास हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देणारा आहे.
आम्ही हा व्यवसाय जपला आहे. गणेशमूर्ती तयार करण्याचे आमचे काम पूर्ण झाले आहे. आता गणेशोत्सव तीन आठवड्यांवर आल्याने सध्या रंगकाम वेगाने सुरू आहे. येत्या आठवड्यात रंगकाम पूर्ण होऊन मूर्तींची विक्री सुरू होईल.’’

PNE25V36904

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT