पिंपरी-चिंचवड

कलाकार कट्ट्याला रसिकांची दाद

CD

पिंपरी, ता.२९ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा’ला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. चिंचवडगावातील राजमाता जिजाऊ उद्यानात पार पडलेल्या कलाकार कट्टयात शाहीर वनिता मोहिते यांच्या संजीवनी महिला शाहिरी पथक यांनी पोवाडा सादर केला.
पारंपरिक वाद्यात ऋषिकेश गायकवाड, जय कसबे, योगेश उकिरडे आणि निखिल झोंबाडे या कलाकारांनी ढोल-ताशा वादन सादरीकरण केले. बालकलाकारांनी नाट्यछटेचे सादरीकरण केले. राजू जाधव आणि सविता इंगळे यांनी कविता, जगदीश खोडके, प्रदीप मांडरे यांनी कराओके, माई गटणे आणि सहकारी यांनी एकनाथी भारूड सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. या वेळी जुबेन आलीफ शेख यांनी लिहिलेल्या ‘द नॉवेल्टीज’ या दोन अंकी नाट्य पुस्तकाचे प्रकाशन नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचे हस्ते करण्यात आले. सुहास जोशी, राजू बंग, सीमा गांधी, प्रकाश ढवळे, गौरी लोंढे, पंकज चव्हाण यांनी या कट्याचे नियोजन केले. आसाराम कसबे यांनी प्रस्तावना केली, किरण येवलेकर यांनी आभार मानले. राज आहेरराव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

"मी दुनियादारी 2 करणार नाही" अखेर संजय जाधव स्पष्टच बोलले; "कदाचित सुहास शिरवळकर.."

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

SCROLL FOR NEXT