पवनानगर, ता.१८ : मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (ता. १६) पवना धरणावर जाऊन जलपूजन केले. तसेच पवनामाईची खणा नारळाने ओटी भरली.
जून व जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे यावर्षी पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मावळवासियांची तसेच पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. शेतकरीही सुखावला आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी पवना धरणावर येत जलपूजन केले.
यावेळी बारणे म्हणाले, ‘‘धरणग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्याकरिता पुन्हा एकदा शासकीय पातळीवर धरणग्रस्त संघटना व शासनाची बैठक आयोजित करून तोडगा काढू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राखीव पाच टक्के कोटा हा फक्त पवना धरणग्रस्तांच्या मुलांसाठी वापरण्यात यावा यासाठी प्रयत्न करु.’’
यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, रिपब्लिकनचे तालुका अध्यक्ष नारायण भालेराव, धरणग्रस्त अध्यक्ष रविकांत रसाळ, पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी रजनीश बारिया आदी नागरिक उपस्थित होते.
अमित कुंभार यांनी प्रास्ताविक केले. रणजित बारिया यांनी पवना धरणाची माहिती दिली. माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी व धरणग्रस्त अध्यक्ष रविकांत रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
PVN25B02278
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.