तळेगाव दाभाडे, ता. ३ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. कृष्णराव भेगडे यांचे ३० जून रोजी निधन झाले. शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यासह भेगडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी माजी मंत्री मदन बाफना, उद्योजक रामदास काकडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू भेगडे, दत्तात्रेय पडवळ आदी उपस्थित होते.
शरद पवार यांनी कृष्णराव भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीदरम्यान, भेगडे कुटुंबीयांनी शरद पवार व कृष्णराव भेगडे यांच्यातील जुने क्षण संग्रहित असलेले काही छायाचित्रे दाखवली. त्या आठवणींनी शरद पवारही काही क्षण भावविवश झाले व त्यांनीही आपल्या जुन्या सहकाऱ्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.
फोटोः 03210
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.