तळेगाव दाभाडे, ता.२ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने गुरुवारी (ता.२) तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांनी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी करत प्रतिकात्मक आंदोलन केले.
पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अपर्णा दराडे, बाळासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, श्रीरंग जाधव, बबन गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
राज्यात भोंदूबाबांचा वाढता सुळसुळाट, त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ आणि घरगुती गॅसच्या तुटवड्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. गॅस वितरक कार्यालयांसमोर लागणाऱ्या रांगांमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.