पिंपरी-चिंचवड

आमदार शेळके समर्थकांची तळेगावात घोषणाबाजी

CD

तळेगाव स्टेशन, ता. १४ ः किशोर आवारे हत्याप्रकरणी फिर्यादीत बदनामीच्या हेतूने नावे गोवल्याचा आरोप करत आमदार सुनील शेळके समर्थक रविवारी (ता. १४) मोर्चा काढणार होते. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर समर्थकांनी शेळके यांच्या कडोलकर कॉलनीमधील निवासस्थानासमोर गर्दी केली होती. दरम्यान, कॉलनीतील रस्ता रहदारीस बंद करून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
दंडाला काळ्या फिती बांधून ‘मी सुनीलआण्णांसोबत’ छापलेल्या टोप्या डोक्यावर घालून, समर्थक शेळके यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले होते. आमदार शेळके निर्दोष असून, त्यांच्यावर राजकीय आकसातून दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत समर्थकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, आवारे यांना श्रद्धांजली अर्पण करून शेळके म्हणाले, ‘‘कुणाच्या जीवावर बेतणारे राजकारण करण्याची वेळ आजपर्यंत आली नाही. या घटनेचा तपास संपेल, त्या दिवशी सर्व बाबी पुढे येतील. या प्रकरणात राजकीय आकसापोटी माझे नाव घालण्याचा आग्रह कोणी केला, हे देखील पोलिसांनी जाहीर करावे. मला बदनाम करणाऱ्याचे नाव कळेल, त्यावेळी शांत बसणार नाही. राजकारणात नाव कमवायला पंधरा वर्षे घालवली. मात्र, पंधरा मिनिटात माझे नाव बदनाम केले. कायद्याला धरूनच पुढे चालणार आहे.’’ समर्थकांचे त्यांनी आभार मानले.

फोटोः 04229

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT