तळेगाव स्टेशन, ता.१३ : हातात खजुराच्या झाडाच्या झावळ्या घेऊन वाद्यांच्या गजरात होसान्ना.. होसान्ना... च्या घोषणा देत आणि येशू ख्रिस्ताचा जयजयकार करत तळेगाव दाभाडे परिसरातील ख्रिस्ती बांधवानी ‘पाम संडे’ अर्थात झावळ्याचा रविवार (ता.१३) मोठ्या उत्साहात साजरा केला.
प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर देण्यात आले. त्या घटनेच्या आधीचा रविवार हा संपूर्ण जगात ‘पाम संडे’ अर्थात झावळ्याचा रविवार म्हणून साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्तांनी गाढवीच्या शिंगरावर बसून येरुसलेम शहरात प्रवेश केला. त्यावेळेस लोकांनी त्याच्या मार्गावर आपली वस्त्रे पसरली आणि हातात झावळ्या घेऊन मोठ्याने ते येशू ख्रिस्ताचा जयजयकार करु लागले. त्याच दिवसाची आठवण म्हणून ख्रिस्ती बांधव हा दिवस साजरा करतात. येणारा आठवडा ते ईस्टर संडेपर्यंत पवित्र सप्ताह म्हणून जगभरामध्ये पाळण्यात येतो. याच झावळ्याच्या रविवारनिमित्त स्टेशन रस्त्यावरील मेथडिस्ट मराठी सेन्टनरी चर्चतर्फे सकाळी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. चर्चमधील सर्व सभासद झावळ्या हातात घेऊन गाणी गात, वाद्ये वाजवत फेरीमध्ये सहभागी झाले. होसान्ना... होसान्ना... प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, अशा ख्रिस्ती बांधवांनी दिलेल्या घोषणांनी मेथडिस्ट मराठी सेन्टनरी चर्चचा परिसर गजबजून गेला. चर्चचे मुख्य धर्मगुरु रेव्ह. जोसेफ ढालवाले यांच्या नेतृत्वाखाली पास्टरेट समिती सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.