पिंपरी-चिंचवड

कृष्णराव भेगडे यांच्यामुळे समाजाला नवी दिशा : बारणे

CD

तळेगाव स्टेशन, ता. ६ : ‘‘माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्यासारखी साधी माणसे आजच्या राजकारणात सापडणे कठीण आहे. समाजाला दिशा दाखवणारा एक कल्पवृक्ष आपल्यातून हरपला आहे. त्यांच्या विचार, कार्यांतून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी,’’ अशा शब्दांत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या विष्णुपुरी शैक्षणिक संकुलात कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (ता.५) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. बी. एम. डोमकुंडवार, गणेश जांभुळकर, आयुब सिकिलकर, सुरेश चौधरी, ज्ञानेश नवले, सुरेश साखवळकर, दीपक शहा, डॉ. अनंत परांजपे, प्रकाश ओसवाल, सुनील भोंगाडे, रविना म्हस्के, दीप्ती म्हस्के, यादवेंद्र खळदे, गणेश खांडगे, श्रीकृष्ण मुळे, डॉ. गिरीश देसाई, संतोष खांडगे, भास्करराव म्हाळसकर, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री संजय भेगडे आदींनी कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

काकडे म्हणाले, ‘‘शिक्षकाची नोकरी ते आमदार या कारकिर्दीत कृष्णराव भेगडे यांनी समाजसेवेचा वारसा सदैव जपला. विरोधी पक्षात असतानाही विधानसभेत कामकाज कसे चालवायचे, याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले. नॅशनल हेवीसारखी मोठी सहकारी संस्था तळेगावात उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेकांना वैयक्तिक शेयर खरेदीचा आग्रह धरत, त्यांनी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उभा करुन हजारो शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था १० लाखांच्या कर्जासाठी १९८१ मध्ये बंद पडण्याच्या मार्गावर होती. त्यावेळी रामकृष्ण मोरे यांना अध्यक्ष करुन, त्यांच्या माध्यमातून कर्ज फेडून संस्थेचे पुनरुज्जीवन केले. पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकसाठी २५ एकर जमीन विनामोबदला संस्थेच्या नावावर करुन दिली. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय उभे केले. मावळात तळेगाव एमआयडीसी उभी राहिली, त्याचे सर्व श्रेय कृष्णराव भेगडे यांनाच जाते.’’

बापूसाहेब भेगडे, राजेश म्हस्के, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत काकडे, नंदकुमार शेलार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मंडळी शोकसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या विष्णुपुरी शैक्षणिक संकुलात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. भेगडे परिवाराच्या वतीने रवींद्र भेगडे यांनी भावना व्यक्त केल्या. विलास भेगडे, डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले.

कृष्णराव भेगडे यांनी आपल्या विचार, कार्याने मावळ तालुक्याला नवी दिशा दिली. आपले स्वभावगुण न बदलता समाजाला दिशा देण्याचे, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना घडवण्याचे काम त्यांनी केले.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

कृष्णराव भेगडे हे आमच्या कुटुंबाचे आधारवड होते. त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वामुळेच आम्हाला मोठ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
- संतोष खांडगे, सचिव, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ

TDB25B03227

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT