
कासा : डहाणू तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड पावसामुळे धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण प्रशासनाने पाच दरवाजे उघडले आहेत. यामुळे सूर्या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीला मोठा पूर आला आहे.