पिंपरी-चिंचवड

मावळात गुरुवारी जमीन हक्क परिषद

CD

वडगाव मावळ, ता. ३० : जमीन हक्क परिषदेच्या वतीने मावळातील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभा करण्यासाठी गुरुवारी (ता. १) रोजी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती परिषदेचे संस्थापक माऊली सोनवणे यांनी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. वनराज शिंदे, परिषदेचे मावळ तालुकाध्यक्ष दिनकर शेटे, चंद्रकांत शिंदे, करूणाताई सरोदे, मिनाक्षी मोरे आदी परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

परिषदेमध्ये गायरानातील व वनजमिनीवरील निवासी अतिक्रमणे कायम करणे, कुळांचे अधिकार, बेकायदेशीर सर्व प्रकारचे दस्तऐवज रद्द करणे, बेकायदेशीर ताबे, वारस हक्क नोंदी, बेकायदेशीर जमीन अधिग्रहण आदी बाबत चर्चा होणार आहे. सर्व प्रकारच्या बाधितांनी न्यायासाठी परिषदेत सामील व्हावे असे आवाहन जमीन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT