पिंपरी-चिंचवड

दिव्यांग जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वडगाव मावळ, ता. १० : मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे दोनशे दिव्यांग बांधवांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
कान्हे येथील साईबाबा सेवाधाम येथे रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या सहकार्याने महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे जिल्हा परिषद, मावळ पंचायत समिती, ग्रामपंचायत कान्हे, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइड, इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती यांच्या वतीने दिव्यांग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, जिल्हास्तरीय राष्ट्रीय न्याय समिती सदस्य भाग्यश्री मोरे, डॉ. कमलजीत कौर दुल्लत, ज्योती राजिवडे, वीरा रुईया, दत्तात्रय चांदगुडे, तानाजी मराठे, भरत राजीवडे, सुरैय्या शेख, मोहिनी काळे, अश्विनी बेंद्रे, रेखा बरीदे आदी उपस्थित होते.
या वेळी हरिदास शिंदे यांनी युडीआयडी कार्ड बद्दलची माहिती दिव्यांग बांधवांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली. पूर्वा जोशी यांनी निरामय विमा योजनेबद्दल व पालकत्व याविषयी माहिती दिली. सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी समाज कल्याणचा उदर निर्वाह भत्ता तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदमधील दिव्यांग बांधवांसाठी ज्या शासकीय योजना आहेत त्यामध्ये घरकुल, शेळीपालन, कुक्कुटपालन व शेती उपयोगी साधने आदीबाबत माहिती दिली. कोणाला काही अडीअडचणी आल्यास पंचायत समितीमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले. नंदकुमार फुले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वंदे मातरम् गीत गाण्यात आले. तानाजी मराठे यांनी सूत्रसंचालन केले. शेलार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT