पिंपरी-चिंचवड

‘ग्रामीण जीवनोन्नती’च्या कर्ज योजनेचा लाभ घ्या

CD

वडगाव मावळ, ता. १९ : ‘‘महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कर्ज योजना राबविण्यात येत असून, मावळ तालुक्यात व्यवसाय करणाऱ्या व आधार उद्योग असणाऱ्या स्वयंसहाय्यता समूहांनी (बचत गट) या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,’’ असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले आहे.
उमेद अभियानाच्या माध्यमातून २०११ पासून कार्यरत असलेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या उपजीविका विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघ अशी त्रिस्तरीय रचना कार्यरत असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रभागसंघामार्फत स्वयंसहाय्यता समूहांना समुदाय गुंतवणूक निधी, पीजी, व्हीआरएफ, व्हीजीएफ आदी विविध निधी वितरित करण्यात येतात. समुदाय गुंतवणूक निधी जिल्हा स्तरावरून प्रभागसंघामार्फत ग्रामसंघाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहांना अदा करण्यात येतो. या निधीच्या परतफेडीतून प्रभाग संघांना व्याज उत्पन्न मिळते. सध्या प्रभागसंघ स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित स्वरूपात उपलब्ध असून, त्याचा योग्य विनियोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सन २०२५-२६ च्या वार्षिक कृती आराखड्यानुसार, प्रभागसंघातील अखर्चित व स्वनिधीमधून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना वैयक्तिक उद्योग व व्यवसायासाठी थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लखपती दीदी संकल्पनेअंतर्गत बँक कर्ज प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेता प्रभागसंघामार्फत कमी व्याजदरात व विहित वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मावळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेची उद्दिष्टे
- स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना वैयक्तिक उद्योगासाठी वेळेत कर्ज उपलब्ध करून देणे
- बँकेपेक्षा कमी व्याजदरात गावपातळीवर कर्ज सुविधा उपलब्ध करणे
- प्रभागसंघातील अखर्चित निधीचा योग्य वापर करणे तसेच व्याज उत्पन्नाच्या माध्यमातून प्रभागसंघ व ग्रामसंघाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे

कर्जाचे स्वरूप
उपजीविका (कृषी, अकृषी व कृषी आधारित) व्यवसायासाठी समृद्धी, उन्नती व शक्ती या प्रकारांतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. कर्ज रक्कम रुपये ७५ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत असून, परतफेड कालावधी २४ ते ६० महिन्यांपर्यंत राहणार आहे. या कर्जावर वार्षिक सात ते आठ टक्के अल्प व्याजदर आकारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

बॉलिवूडने नाकारलं, बिझनेसने तारलं! विवेक ओबेरॉय कसा बनला कोट्यवधींचा मालक? नेमके कुठे गुंतवले पैसे? स्वतः सांगितला प्लॅन

BMC Election: महापालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात नोटाला जास्त मतं? आकडेवारी समोर

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘ती’चा आवाज! ६९ रणरागिणींनी लुटले विजयाचे वाण; शिवसेनेच्या सर्वाधिक ४० नगरसेविका

SCROLL FOR NEXT