पिंपरी-चिंचवड

धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी

CD

वडगाव मावळ, ता. १३ : मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ व बलपूर्वक फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल पगडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, जिल्हा मातृशक्ती संयोजिका राजश्री वाघचौरे, जिल्हा संपर्क प्रमुख निखिल भांगरे, विनायक भेगडे, वर्षा क्षीरसागर, भाग्यश्री जाधव, सीमा निकम, विनया कडू आदी पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन कायदा करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सन्मानासाठी व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सदर कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT