पिंपरी-चिंचवड

थेरगावातील जलतरण तलाव तीन वर्षे धूळ खात दुरवस्थेमुळे नागरिक नाराज ः नूतनीकरणाच्या नावाखाली सर्वत्र राडारोडा

CD

बेलाजी पात्रे
वाकड, ता. १९ : थेरगावकरांसाठी गुजर नगर येथे बांधण्यात आलेला खिंवसरा-पाटील जलतरण तलाव नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या वर्षभरापासून धूळखात पडला आहे. तलावाची मोठी दुरवस्था झाली असून, सर्वत्र राडारोडा आहे.
तलावाची खोली कमी करणे, सीमा भिंतीची उंची वाढवणे व अन्य नूतनीकरणाच्या कामासाठी सुमारे पावणे दोन कोटीच्या रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली. कामही सुरू झाले. मात्र, कोरोनापासून बंद असलेला हा तलाव आता नूतनीकरण होऊन ऐन उन्हाळ्यात तरी नागरिकांसाठी खुला केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप तरी तशा हालचाली अजिबात दिसत नसल्याने रहिवाशांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
१० ऑगस्ट १९९८ मध्ये लोकसभेतील तत्कालीन विरोधी पक्ष नेते शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या तलावाचा थेरगावसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उपयोग होत होता. मात्र, कोरोना काळात हा तलाव बंद करण्यात आला तर खासदार श्रीरंग बारणे यांनी तलावाची उंची कमी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, तलावाच्या आजूबाजूला विविध सोसायट्या व लोकवस्ती झाल्याने महिलांसाठी तो बंदिस्त करावा, असा प्रस्ताव नगरसेविका माया बारणे यांनी देत पाठपुरावा देखील केला. अन्य नगरसेवकांनीही काही मागण्या केल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देऊन पाहणी करत नूतनीकरणास मान्यता दिली.
त्यानुसार जानेवारी-फेब्रुवारी २०२२ ला सुमारे पावणे कोटी रुपये खर्चाची वर्क ऑर्डर निघाली. १८ महिन्यांच्या मुदतीवर काम सुरूही झाले. मात्र, काहीच दिवसात माशी कुठे शिंकली कळले नाही आणि काम आजतागायत संथ गतीने सुरू आहे. सध्या जलतरण तलाव परिसराला अडगळीचे स्वरूप आले आहे.

‘‘कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे जलतरण तलाव बंद आहे. त्यामुळे तो मेंटेन नाही. त्यानंतर तलावाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले, ते आजतागायत सुरूच आहे. पण लवकरात लवकर काम पूर्ण करून तलाव नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
- रवींद्र पवार,
कार्यकारी अभियंता, क्रीडा स्थापत्य

‘‘तलावाच्या नूतनीकरणाचे काम सुरूच आहे. त्यास अठरा महिन्यांची मुदत आहे. या उन्हाळ्यात काम पूर्ण होऊन, तो वापरात येणं अवघड आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तलावाची उंची कमी करणे व एकाच बाजूला म्हणजे हॉस्पिटलच्या बाजूने तो बंदिस्त करणे ही कामे सुरू आहेत.
- वैशाली ननावरे, उपअभियंता क्रीडा स्थापत्य


‘‘या तलावात मोठ्या संख्येने महिलादेखील येत असत. त्यामुळे जलतरण तलाव बंदिस्त करण्याची मागणी मी लावून धरली. त्यास यश मिळाले. मात्र, महापालिका प्रशासकाच्या राजवटीत हे काम रखडले आहे. कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थेरगाव, वाकड, ताथवडे, पुणावळेसह परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
- माया बारणे,
माजी नगरसेविका

फोटोः 03527, 03528.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT