पिंपरी-चिंचवड

सार्वजनिक पदपथ चक्क भाड्याने!

CD

वाकड/हिंजवडी : आयटी हबमुळे थेरगाव-वाकड या उपनगरांसह हिंजवडी प्रचंड विस्तारली. वाढत्या शहरीकरणामुळे येथील रस्ते वाहनांच्या वर्दळीने ओसंडून वाहत असताना येथील पदपथ देखील अतिक्रमणाने व्यापले आहेत. त्यामुळे नाइलाजाने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. काही ठिकाणी पदपथ चक्क भाड्याने देवून तेथे लाखोंची कमाई केली जात आहे.
महापालिकेने नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून पदपथ उभारले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते गायब झाले असून, ही फुकटचे पदपथ भाड्याने देऊन काहीजण फुकटात मालामाल होत आहेत. वाकड-थेरगाव भागात हा गोरखधंदा तेजीत आहे. अनेक रस्त्यांवरील पदपथावर व्यावसायिकांनी आपले साहित्य टाकून ते अडविले आहे. काहींनी तर पदपथ म्हणजेच जणू त्यांच्या ग्राहकांची अधिकृत पार्किंग असल्याची खात्री दिल्याने वाकड-थेरगावमधील रस्ते आणि पदपथ वाहनांच्या पार्किंगने व्यापले आहेत.
थेरगाव मधील डांगे चौक, १६ नंबर, गुजर नगर, पवार नगर, साईनाथ नगर, थेरगाव गावठाणचा काही भाग, आनंदवन, मंगल नगर, गणेश नगर, शिवकॉलनी यासह विविध भागात पदपथ गायब झाले असून, त्यावर भाजीपाला, फळे, खाद्य विक्रेते, पान टपरी, पंक्चर, खेळणीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. वाकडमधील उत्कर्ष चौक, विनोदेनगर चौक, पिंक सिटी रस्ता, जानोबा चौक यासह संपूर्ण दत्त मंदिर रस्ता तसेच कस्पटे वस्तीतील विविध रस्ते व चौक व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे जणू पदपथ मुक्त झाले आहेत.

हिंजवडीत बिकट परिस्थिती
हिंजवडी : हिंजवडीतील प्रमुख रस्तेच अतिक्रमणाने व्यापले आहेत. तिथे पदपथांचा विषयच येत नाही. त्यामुळे वाहनांना होणाऱ्या त्रासासह पादचाऱ्यांची मोठी अग्निपरीक्षा येथे सुरू असते. तरीही गुरुवारी (ता. ११) हिंजवडी वाहतूक पोलिसांनी पदपथ गिळंकृत करणाऱ्या तब्बल शंभर विक्रेत्यांना हटविले आहे. यापूर्वीही अनेकदा एमआयडीसी, स्थानिक पोलिस, ग्रामपंचायत संयुक्त कारवाई करून ही अतिक्रमणे हटवितात. मात्र, लाखोंचे भाडे कमाविण्याची सवय लागल्याने पुन्हा काही दिवसांतच ‘जैसे थे’ परिस्थिती होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT