पिंपरी-चिंचवड

प्रिस्टीन प्रो लाईफमध्ये सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित

CD

वाकड, ता. ५ : वाकडमधील प्रिस्टीन प्रोलाइफ फेज ३ सोसायटीतील १२० किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौरउर्जा नुकताच कार्यान्वित करण्यात आला. त्यासाठी सोसायटीला २१.६७ लाख रुपयांचे सरकारी अनुदान मिळाले.
या प्रकल्पाचे उद्‍घाटन नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अल्केश चरपे, सचिव स्वरूप पाटील, खजिनदार अरविंद, अनुराग शिरोडे, भिवाजी सूर्यवंशी, श्रीधर घरपुरे, प्रशांत गोरे, अनुराग तिवारी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी सुमारे ७६ लाख रुपये खर्च झाला. मात्र त्याद्वारे दर महिन्याला सोसायटीच्या सुमारे २ लाख ३० हजार इतक्या वीज बिलाची बचत होणार आहे. तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जेच्या वापराला मोठी चालना मिळणार आहे, असे मत सोसायटीचे सचिव स्वरूप पाटील व अध्यक्ष अल्केश चरपे यांनी व्यक्त केले.

प्रिस्टीन प्रोलाइफ फेज ३ सोसायटीतील सदस्यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून सरकारची मदत आणि कालमर्यादा यासाठी हा प्रकल्प संपूर्ण शहरात ‘रोल मॉडेल‘ ठरेल. असे प्रकल्प इतर सोसायटीत राबवले गेले पाहिजेत.
- राहुल कलाटे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा आरसा समोर येणार! आर्थिक सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री मोठा अर्थसंकल्प मांडणार; भर कशावर?

जमीनधारकांना गुड न्यूज! जमीन रूपांतराचा नियम बदलला; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

SCROLL FOR NEXT