Turkish millet
Turkish millet sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi News : जांबेत बहरली तुर्कीची बाजरी, जिल्ह्यातील पहिला यशस्वी प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - उंचच उंच पिक, कणसं दोन ते तीन फुटांहून अधिक लांब....जणू पानकणीसचं भासावे, परिपूर्ण भरलेले दाणे, कमी जागेत भरघोस उत्पादनाची हमी. होय हे अगदी खरं आहे. तुम्ही तुर्की बाजरीबद्द्ल ऐकलंय का? नसेल ऐकलं तर आयटी पार्क शेजारील जांबे गावात (ता. मुळशी) शेतकऱ्याच्या अफलातून प्रयोगाची. बातमी खास तुमच्यासाठी..

आधुनिक शेती प्रयोगातून बळीराजा नैसर्गिक संकटांसह इतर संकटांवरही मात करू शकतो हे प्रयोगशील शेतकरी अविनाश गायकवाड यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.

अविनाश गायकवाड यांनी तुर्की देशी वाण ह्या उन्हाळी बाजरीची पेरणी केली आहे. यातून चांगले उत्पादन मिळणार आहे. एका एकरमधून सुमारे ३० क्विंटल बाजरीचे हमखास उत्पादन मिळणार आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने, शेतकऱ्याचा प्रयोग अन त्यांची तुर्की बाजरी तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

ती बाजरी पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीत गर्दी करीत आहेत. गायकवाड यांनी तुर्की देशी वाण बाजरीचा फेब्रुवारी महिन्यात सरी वरती बाजरीचे बी टोकुन लागण केली. ही बाजरी फुलोऱ्यात आहे.

३० गुंठे क्षेत्रावर त्यांनी बाजरीचा प्रयोग यशस्वी केला आहे. तुर्की देशातील बाजरीचे बियाणे नाशिक येथील शेतकऱ्यांकडून मिळविले. या बाजरीची उंची १० ते ११ फुटांपर्यंत वाढली आहे. तिला साधारण तीन फुटांपर्यंत लांबीची कणसे आली आहेत. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे, यामुळे त्यांना ३० गुंठ्यामध्ये २० ते २५ किंटल पेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

वारंवार नापीकी, रोगराई, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटात बळीराजा कायम होरपळतो.शेतीत आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी विकसनशील व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. मात्र, अविनाश यांनी कृतीतून आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

ही बाजरी खाण्यासाठी देशी गावरान वाणाच्या बाजरीसारखी चविष्ट असून उत्पादन क्षमता देशी वाणापेक्षा चारपट अधिक आहे. इतर शेतकऱ्यांनीही या माध्यमातून विकसनशील प्रयोग करून स्वतःला बळकटी द्यावी असे आवाहन गायकवाड यांनी सकाळशी बोलताना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT