Woman died in explosion of domestic gas cylinder happen in Dighi
Woman died in explosion of domestic gas cylinder happen in Dighi 
पिंपरी-चिंचवड

दिघी गॅस स्फोटातील महिलेचा अखेर मृत्यू

अर्चना सुरवाडे

भोसरी(पिंपरी) : दिघीतील महादेवनगरमधील अष्टविनायक सोसायटीत रविवारी (ता. ९)  सकाळी साडेसहा वाजता घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीने स्फोट होऊन लागलेल्या आगीत ९० टक्के भाजल्याने अर्चना महेंद्र सुरवाडे (वय ३५) यांचा बुधवारी (ता. १२) पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या स्फोटात अंगावर भिंत पडून ज्ञानेश्वर मधूकर टेमकर (वय ४०) यांचा रविवारी (ता. ९) जागीच मृत्यू झाला होता.
   
प्रशासक नियुक्तीवरून महाआघाडी सरकारला ३४ याचिकांचे आव्हान

दिघीतील महादेवनगरातील अष्टविनायक सोसायटीमध्ये सकाळी महेंद्र हरिभाऊ सुरवाडे (वय ४०) यांच्या घरी रात्रभर गॅस गळती होऊन स्फोट झाला होता.  या स्फोटामुळे सुरवाडे यांच्या शेजारी राहणारे ज्ञानेश्वर मधूकर टेमकर (वय  ४०)  यांच्या अंगावर भिंत पडून ते जागीच ठार झाले होते. स्फोटात लागलेल्या आगीत अर्चना महेंद्र सुरवाडे (वय 35 वर्ष) या ९५ टक्के,  आकांक्षा  महेंद्र सुरवाडे (वय15 वर्ष) ही ६० टक्के भाजली होती. तर  महेंद्र  सुरवाडे, दीक्षा महेंद्र सुरवाडे (वय 13 वर्ष), अमित महेंद्र सुरवाडे (वय 8 वर्ष) हे चाळीस टक्क्यांपेक्षा कमी भाजले होते. ससून रुग्णालयात उपचारानंतर महेंद्र सुरवाडे आणि दीक्षा सुरवाडे यांना घरी सोडण्यात आले.  मात्र ९५ टक्के भाजले असल्याने अर्चना सुरवाडे यांचा बुधवारी (ता. १२) मृत्यू झाला. तर  आकांक्षा आणि अमित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

महेंद्र सुरवाडे हे ओला-उबेर प्रवासी वाहन चालवितात. मात्र लॅाकडाऊनमुळे प्रवासी वाहने बंद झाल्याने सुरवाडे कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले होते. घराचा गाडा चालविण्यासाठी अर्चना या भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जात होत्या. आठ वर्षापूर्वीच त्यांनी दिघीमध्ये सदनिका घेतली होती.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT