पिंपरी-चिंचवड

आईला मारल्याच्या रागातून मावसभावाला संपविले 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आईला मारहाण केल्याचा राग व जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना तळवडे येथील स्मशानभूमीजवळ घडली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने दोघांना जेरबंद केले. 

संकेत गायकवाड (रा. निघोजे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहन रवींद्र जगताप (वय 20, रा. निघोजे), विशाल अशोक चव्हाण (वय 21, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार महाराज (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी रोहन व संकेत हे मावसभाऊ आहेत. शुक्रवारी रात्री देहूरोड पोलिस गस्त घालत असताना तळवडे-चाकण रस्त्यावरील तळवडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संकेतचा मृतदेह आढळला. पोलिसांनी चौकशी केल्यावर संकेतचे त्याच्या मावशीसोबत जमिनीच्या कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपी रोहन व विशाल यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला रोहनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रडण्याचे नाटक केले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, रोहनने त्याचा साथीदार विशाल व महाराज यांच्यासोबत मिळून संकेतचा खून केल्याची कबुली दिली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संकेत याने जमिनीच्या वादातून रोहनच्या आईला पोटात लाथाबुक्‍क्‍या मारून शिवीगाळ केली होती. या रागातून रोहनने संकेतचा खून करण्याचा कट रचला. शुक्रवारी आरोपी ओटास्कीम निगडी येथून निघोजे गावाकडे जाताना तळवडे ब्रिजजवळ संकेत थांबल्याचे दिसले. आरोपींनी संकेतला गोड बोलून ब्रिजच्या खाली नेले. तिथे त्याच्यासोबत भांडण करून त्याला दगडाने मारहाण केली. त्याचा चेहरा ओळखता येऊ नये यासाठी आरोपींनी मोठमोठे दगड संकेतच्या चेहऱ्यावर मारून त्याचा चेहरा विद्रूप केला. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने चोवीस तासात आरोपींना अटक केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT