Albattya Galbattya
Albattya Galbattya ESAKAL
Premier

Albattya Galbattya: 'हा' अभिनेता पुन्हा एकदा साकारणार चिंची चेटकीण, सिनेमाच्या टीझरनं जिंकली मनं

priyanka kulkarni

Albattya Galbattya: चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या नाटकाने रंगभूमी गाजवली. 'अलबत्त्या गलबत्त्या' (Albattya Galbattya) पेक्षा चिंची चेटकीण जास्त लोकप्रिय झाली. छोट्या प्रेक्षकांना आवडलेलं हे नाटक आता सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.

नाटकानंतर बऱ्याच काळाने अभिनेता वैभव मांगले चिंची चेटकिणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या टीझर मध्ये वैभव चिंची चेटकिणीच्या रूपात दिसत असून "किती गं बाई मी हुशार" हे चेटकिणीचं लाडकं वाक्य ऐकू येतंय तर काहीसं गूढ म्युझिकही बॅकग्राउंडही ऐकू येतंय. या टीझरने सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष ऐकून घेतेय. अभिनेता स्वप्नील जोशीने हा टीझर सोशल मीडियावर रिपोस्ट करत सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

पहा टीझर :

सिनेमाची स्टार कास्ट

'अलबत्त्या गलबत्त्या' या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत. वरुण नार्वेकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून थ्री डी रूपात बच्चेकंपनीला हा सिनेमा एन्जॉय करता येणार आहे. संजय छाब्रिया, सुधीर कोलते आणि ओंकार माने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सिनेमाची ही आहे गोष्ट:

अलबत्त्या नावाचा सैनिक चिंची चेटकिणीच्या कारस्थानाला बळी पडून एक खजिना शोधण्यासाठी बाहेर पडतो. हा खजिना त्याला मिळतो का? चिंची चेटकिणीला अलबत्त्या कसं हरवतो ही मनोरंजक गोष्ट रत्नाकर मतकरी यांनी नाटक स्वरूपात लिहिली होती आणि आता यावर आधारित सिनेमा येत असून सिनेमाच्या दृष्टीने कथानकात काय बदल झाले असतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

१ मे २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वैभव मांगले यांनी या आधी अलबत्त्या गलबत्त्या या नाटकात काम केलं होतं. या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग केल्यानंतर वैभव यांनी हे नाटक सोडलं. या नाटकाचे हजारो प्रयोग रंगभूमीवर झाले आहेत तर वैभव यांनी साकारलेली चिंची चेटकीण सुपरहिट झाली होती.

यासोबतच वैभव यांचं रंगभूमीवर मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक सुरु असून या नाटकात त्यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, सुकन्या काळन, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण यांच्या मुख्य भूमिका आहेत. यासोबतच वैभव यांचा होय महाराजा हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : स्टार प्रचारकांची फौज दिल्लीत;२५ मे रोजी मतदान; मोदी, नड्डा, खर्गे, राहुल, प्रियांका घेणार सभा

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Jammu & Kashmir: 'कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्य'; सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या

Sakal Podcast : मराठीच्या पेपरमध्ये ३३४२ जण नापास ते IPLमध्ये कोणाची कामगिरी ठरणार ‘रॉयल’?

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

SCROLL FOR NEXT