Premier

Bade Miyan Chote Miyan Movie Review: विनोदाबरोबरच ॲक्शनचा थरार

Chinmay Jagtap

संतोष भिंगार्डे

हिंदी चित्रपटसृष्टीतील खिलाडी कुमार अक्षय आणि अॅक्शन स्टार टायगर श्राॅफ यांच्या बडे मियां छोटे मियां या चित्रपटाची गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. या चित्रपटाचे सेटवरील काही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सगळ्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागलेली होती.

अखेर हा चित्रपट मोठ्या स्तरावर प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी या चित्रपटामध्ये देशाभिमानाची कथा मांडलेली आहे. ती मांडताना चित्रपट कुठेही रेंगाळणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. अॅक्शनचा थरार, स्पेशल इफेक्टसचा योग्य असा वापर आणि अधेमधे हलक्या आणि खुसखुशीत विनोदाची पेरणी त्याने उत्तम केली आहे.(Bade Miyan Chote Miyan Review)

चकचकीत आणि लॅविश असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते ती भारतीय सैन्यातील जवानांची एक तुकडी अतिशय किमती असे सिक्रेट पॅकेज घेऊन निघालेली असते. हे सिक्रेट अतिशय मौल्यवान असते आणि ते गुप्त ठिकाणी ठेवण्यासाठी भारतीय जवान निघालेले असतात.

अशा वेळी चेहऱ्यावर मास्क घातलेली जाडजूड अशी एक व्यक्ती त्या जवानांवर हल्ला करते आणि ते सिक्रेट त्यांच्याकडून आपल्याकडे हिरावून घेते. त्यानंतर ते सिक्रेट पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी कर्नल आझाद (रोनित राॅय) दोन व्यक्तींची निवड करतात. त्यातील एकाचे नाव असते फ्रेडी (अक्षय कुमार) आणि दुसरा असतो राॅकी (टायगर श्राॅफ). हे दोघेही भारतीय सैन्यदलात काम करीत असतात. परंतु त्यांना कोर्ट मार्शलची शिक्षा झालेली असते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी कॅप्टन मीशा (मानुषी छिल्लर) हिला पाठविले जाते. ती त्यांचा शोध घेते आणि कर्नल आझाद यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविते.

मग ते आपला देश वाचविण्यासाठी तयार होतात. त्यानंतर कथा कशी पुढे सरकते ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे. दिग्दर्शक अब्बास अली जफर यांनी सुल्तान, टायगर जिंदा है असे काही चित्रपट लिहिले आणि दिग्दर्शित केले आहेत. मोठमोठ्या कलाकारांबरोबर त्याने काम केले आहे. या चित्रपटातही अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आदी कलाकारांना त्याने घेतले आहे आणि मनोरंजनात्मक चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे.(Sonakshi Sinha Latest Movie)

चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी तिची मांडणी त्याने उत्तम केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, त्याचबरोबर काही अर्थपूर्ण तर काही चटपटीत विनोदी संवाद, क्लोनिंग तंत्राचा वापर या सगळ्या बाबी या चित्रपटामध्ये प्रकर्षाने दिसतात. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या कलाकारांबरोबर अन्य कलाकारांनीदेखील छान काम केले आहे. Akshay Kumar Latest Movie

विशेष कौतुक करावे लागेल ते अलाफा एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचे. अलायाने बडबडी आणि काहीशी चटपटी अशी पाम ही व्यक्तिरेखा झकास साकारली आहे. पृथ्वीराजने कबीर ही भूमिका उत्तम प्रकारे निभावली आहे. ही भूमिका खलनायकी आहे आणि ती कमालीची थरारक झाली आहे. अक्षय आणि टायगर हे दोन्ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार. दोघेही ॲक्शन आणि डान्समध्ये तरबेज.(Tiger Shroff latest movie)

त्यांनी जणू काही आपल्याच खांद्यावर संपूर्ण चित्रपट घेतला आहे. दिग्दर्शकाने दोघांच्याही भूमिकांना समसमान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या दोघांनीही चित्रपटामध्ये उत्तम काम केले आहे. चित्रपटातील संवाद ताजेतवाने आहेत. मस्त मलंग झुम आणि शीर्षक गीत अगोदरच लोकप्रिय झालेले आहे. तसेच स्पेशल इफेक्ट्‍स आणि ॲक्शन डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत. हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लोनिंग आणि अनेक आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाविषयी भाष्य करणारा आहे. स्टीव्हन बर्नार्डने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाचा वेग कायम ठेवण्याचा छान प्रयत्न केला आहे.(Prithviraj Sukumaran latest movie)

आणि Marcin Laszkiewicz ने त्याच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जॉर्डन, अबुधाबी वगैरे ठिकाणची दृश्ये त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. तरीही चित्रपटामध्ये काही त्रुटी जाणवतात. तरीही अक्षय, टायगर, सोनाक्षी आदी बडे कलाकार तसेच विनोदाची अधेमधे होणारी बरसात आणि थरारक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे.

-साडेतीन स्टार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT