Avika Gor in Balika Vadhu Esakal
Premier

Avika Gor : बॉडीगार्डने केला बालिका वधू फेम अविका गौरचा लैंगिक छळ ; 'ते खूप लज्जास्पद होतं'

Avika Gor on Sexual Harrasment : बालिका वधू फेम अविका गौरने तिच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या घटनेविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

Avika Gor : 'बालिका वधू' मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण करत सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री अविका गौरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीत तिला आलेले अनुभव शेअर केले. यावेळी तिने कझाकिस्तानच्या एका बॉडीगार्डने तिचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघड केली.

अविकाला बसला धक्का

'हॉटरफ्लाय' या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना अविकाने मुलाखत दिली. त्यावेळी तिने ही घटना रिव्हील केली. एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर जाताना बॉडीगार्डने तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला ज्याने तिला खूप धक्का बसला असं तिने म्हंटलं.

"आणि त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला"

ही आठवण सांगताना अविका म्हणाली कि, त्यावेळी तिला वाटलं कुणीतरी तिला मागून स्पर्श करण्याचा प्रयत्न करतंय. तिने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा तिला तिचा बॉडीगार्ड दिसला. ही गोष्ट फक्त एकदा नाही तर दोनदा घडल्याचंही तिने उघड केलं. ते पुन्हा घडणार तितक्यात तिने तिच्या बोदीग्राडचा हात पकडला.

"मला आठवतंय कुणीतरी मला मागून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतं. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा फक्त माझ्या मागे एक सिक्युरिटी गार्ड होता. मी तेव्हा स्टेजवर जात होते आणि कुणीतरी मला मागून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जशी मी मागे वळले तेव्हा माझ्या लक्षात आलं कि माझ्या मागे फक्त एक सुरक्षा अधिकारी आहे बाकी कोणी नाही. मला माहित होतं हे दुसऱ्यांदाही होणार आणि मी ते थांबवलं." असं ती म्हणाली.

" ते खूप लाजिरवाणं होतं आणि मी फक्त त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली. त्यानंतर मी काय करू शकणार होते ? मी त्याला सोडून दिलं. त्याला त्याच्या कृतीचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर काय होतो याची जाणीव झाली नसेल." असंही अविका पुढे म्हणाली.

अविकाची कारकीर्द

अविकाने कलर्स टीव्हीवरील 'बालिका वधू' मालिकेतून अभिनयक्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'ससुराल सिमर का' या मालिकेत काम केलं. त्या मागोमाग ती 'लाडो' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. गेल्या वर्षी तिच्या 'वधुवू' आणि 'मॅन्शन २४' या वेब सिरीज रिलीज झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur politics: मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; साेलापूर जिल्ह्यात नव्या समीकरणांची शक्यता!

Women writers and kitchen representation in literature : स्वयंपाकघरातील अनुभवांचे साहित्यिक दर्शन: स्त्री लेखिकांची भूमिका

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये महापौरपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा; इच्छुकांची फिल्डिंग, ‘स्वीकृत’साठीही मोर्चेबांधणी, पुढील आठवड्यात हालचाली!

Solapur Accident:भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, दाेन महिला जखमी; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना..

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT